Join us

संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल'चा फर्स्ट लूक आऊट, 'या' दिवशी होणार ट्रेलर आऊट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 21:00 IST

शर्मिन सहगला आणि मिजान जाफरी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याला कारण ही तसेच आहे, दोघे ही लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

ठळक मुद्देशर्मिन सहगल ही संजय लीला भंन्साळी यांची भाची आहे मिजान जाफरी हा अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा आहे

शर्मिन सहगला आणि मिजान जाफरी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याला कारण ही तसेच आहे, दोघे ही लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या मलाल सिनेमातून दोघे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतायेत.  शर्मिन सहगल ही संजय लीला भंन्साळी यांची भाची आहे तर मिजान जाफरी हा अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा आहे. 

 

मलाल हा एक रोमाँटिक सिनेमा आहे. ज्यात शर्मिन आणि मिजान रोन्मास करताना दिसणार आहेत. संजय लीला भंन्साळी यांनी याआधी ही बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना लाँच केले आहे.  ११ वर्षांपूर्वी त्यांनी सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांना ‘सावरियां’मधून लॉन्च केले होते. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फ्लॉप ठरला होता. पण यातील सोनम आणि रणबीरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. आता भन्साळी खुद्द आपल्या भाचीला लॉन्च करणार आहेत. शर्मिन ही भन्साळींच्या बहीणीची मुलगी आहे. मलालचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आपल्याला लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. मलालचा ट्रेलर 18 मे रोली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

 ‘मलाल’ हा चित्रपट दिग्दर्शक मंगेश दिग्दर्शित करणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शन एक मराठमोळा दिग्दर्शक करतोय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंगेश हाडवळे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. शर्मिनमधील टॅलेन्ट बघूनचं भन्साळींनी तिला लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ तिच्याचमुळे भन्साळी ‘मलाल’ प्रोड्यूस करत आहेत. 

टॅग्स :संजय लीला भन्साळी