Join us  

आणखी एका स्टार किडची होणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री, त्यासाठी घेते इतकी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:20 PM

बॉलीवुडचा अभिनेता संजय कपूर याची लाडाची लेक म्हणजे शनाया कपूर लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

गेल्या काही वर्षात बी-टाऊनमध्ये आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे यांच्यानंतर सुहाना खान, आर्यन खान आणि शनाया कपूर असे बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. 

लवकरच अभिनेत्री सोनम कपूरची चुलत बहिण. बॉलीवुडचा अभिनेता संजय कपूर याची लाडाची लेक म्हणजे शनाया कपूर लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. सोशल मीडियावर तिचे एक से बढकर एक फोटोशूट पाहून तिची पूर्वतयारी सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. शनाया कपूर चुलत बहिण सोनमपेक्षा सौंदर्यांत कुठेही कमी नाही. 

शनाया अचानक साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. याला निमित्त ठरले तिचे हे ग्लॅमरस फोटोशूट. फोटोशूटमध्ये शनायाचं सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन गेला.  शनाया ग्लॅमरस अंदाज पाहून तिला एकसे बढकर एक कमेंटस नेटीझन्सकडू मिळतायेत.1९ वर्षीय शनाया कपूरने सोनमच्या लग्नात लेंहगा आणि गोल्डन रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. त्यावेळी संपूर्ण लग्नात तिचा हा अंदाज भलताच भाव खाऊन गेला. 

अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची शनाया ही लेक आहे. चुलत बहिण सोनमप्रमाणेच फॅशनिस्टा अशी शनाया कपूरची ओळख निर्माण होवू लागली आहे. आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते.

बॉलीवुडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते. रूपेरी पडद्यावर एंट्री मारण्यापूर्वीच शनाया सोशल मीडियावर नेटीझन्सचीदेखील पंसती ठरते आहे. सोशल मीडियावर शनायाचा ग्लॅमरस अंदाज सारेच अनुभवत आहे. त्यामुळे तिचा. हाच अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शनाया कपूरसुद्धा लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण केले तर आश्चर्य वाटायला नको.  

टॅग्स :शनाया कपूरसंजय कपूर