संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने केले आहे बी ग्रेड चित्रपटात काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 16:01 IST
संजय दत्तचे पहिले लग्न रिचा शर्माशी झाले होते. पण रिचाला ब्रेन ट्युमर असल्याने तिचा मृत्यू 1996ला झाला. त्यानंतर काही ...
संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने केले आहे बी ग्रेड चित्रपटात काम
संजय दत्तचे पहिले लग्न रिचा शर्माशी झाले होते. पण रिचाला ब्रेन ट्युमर असल्याने तिचा मृत्यू 1996ला झाला. त्यानंतर काही वर्षांनी संजयने प्रसिद्ध मॉडेल रिया पिल्लईशी लग्न केले. पण त्यांच्यात काहीच वर्षांत खटके उडायला लागले. 2005मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रियाशी घटस्फोट घेतल्यानंतर दिलवाज शेख म्हणजेच मान्यता नावाची अभिनेत्री त्याच्या आयुष्यात आली. मान्यताने हिंदी चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. गंगाजल या चित्रपटात मान्यता एका आयटम साँगमध्ये झळकली आहे. याच चित्रपटाच्यावेळी प्रकाश झा ने दिलवाज हे नाव बदलून तिला मान्यता हे नाव दिले. संजय दत्त आणि मान्यताने 2008मध्ये लग्न केले. मान्यता आणि संजय यांची ओळख त्याच्या एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. संजय आयुष्यात आल्यानंतर मान्यताने चित्रपटात काम करणे बंद केले. मान्यताने काही बी ग्रेड चित्रपटात देखील काम केले आहे. लव्हर्स लाइक अस या बी ग्रेड चित्रपटात तिने 2005मध्ये काम केले होते. मान्यताने बी ग्रेड चित्रपटात काम करणे संजयला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने या चित्रपटाचे सगळे हक्क विकत घेतले आणि या चित्रपटाच्या सगळ्या सीडी, डिव्हीडी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. मान्यता संजयच्या आय़ुष्यात आली, त्यावेळी संजय एका दुसऱ्याच स्त्रीच्या प्रेमात होता. कांटे या चित्रपटाच्यावेळी संजय नादिया दुर्रानी या ज्युनियर आर्टिस्टच्या तो प्रेमात पडला होता. ती संजयपेक्षा 20 वर्षांनी लहान होती तर तिला नऊ वर्षांची मुलगी देखील होती. ते दोघे एकत्र देखील राहात होते. पण त्याचकाळात मान्यता त्याच्या आयुष्यात आली. मान्यता संजयची खूप काळजी घेत असे. त्यामुळेच तो नकळत तिच्या प्रेमात पडला. मान्यता आणि संजय यांच्यातदेखील 20 वर्षांचे अंतर आहे.