साऊथची ‘ही’ अभिनेत्री बनणार संजय दत्तची ‘बहीण’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 15:20 IST
संजय दत्त याच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. या बायोपिकचे अद्यापही नाव ठरलेले नाही. पण संजयच्या भूमिकेत रणबीर ...
साऊथची ‘ही’ अभिनेत्री बनणार संजय दत्तची ‘बहीण’!
संजय दत्त याच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. या बायोपिकचे अद्यापही नाव ठरलेले नाही. पण संजयच्या भूमिकेत रणबीर कपूरला पाहायला लोक उत्सूक आहेत. चित्रपटाचे शूटींग जवळपास पूर्ण झाले आहे. संजयच्या भूमिकेत रणबीर कपूर, संजयचे वडिल सुनील दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल, संजयची आई नर्गिस यांच्या भूमिकेत मनीषा कोईराला, संजयची पत्नी मान्यता दत्त हिच्या भूमिकेत दिया मिर्झा अशी स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजयची बहीण प्रिया दत्त हिची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात होते. पण आता ही भूमिका कोण साकारणार, हेही उघड झाले आहे. होय, अभिनेत्री अदिती सिया या बायोपिकमध्ये प्रिया दत्तच्या रोलमध्ये असेल. अदिती ही साऊथची हिरोईन आहे. प्रिया दत्तच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींच्या नावावर चर्चा झाली आणि अखेर ही भूमिका अदितीच्या झोळीत पडली.या बायोपिकमध्ये रणबीर कपूर तीन वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. एक म्हणजे, संजय दत्तचा बॉलिवूड डेब्यू, मग त्याला लागलेले ड्रग्सचे व्यसन आणि नंतर तुरुंगातील शिक्षा. संजयच्या भूमिकेसाठी रणबीरने बरीच मेहनत घेतलीयं. खरे संजय दत्तची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायचे म्हटल्यावर रणबीर आधी प्रचंड घाबरला होता. अलीकडे एका मुलाखतीत त्याने यामागचे कारण सांगितले होते. संजयचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवणे हे माझ्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. प्रेक्षकांचे आजही संजय दत्तवर प्रचंड प्रेम आहे. त्याचे फॅन फॉलोईंग मोठे आहे. हे सगळे बघून संजय दत्त साकारण्यासाठी मी थोडा घाबरलेला होतो. संजय दत्त सारखा लूक आणणे कठिण नव्हते कारण मेकअपच्या सहाय्याने ते करणे शक्य होते. मात्र कठीण होते ते तिचे आयुष्य मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांनासमोर मांडणे, असे रणबीर म्हणाला होता.