Join us

संजय दत्त दिसणार 'साहेब बीवी और गँगस्टर 3'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 11:39 IST

नुकतेच संजय दत्तने तिग्मांशु धूलियाची 'साहेब बीवी और गँगस्टर 3' हा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात संजय एका ...

नुकतेच संजय दत्तने तिग्मांशु धूलियाची 'साहेब बीवी और गँगस्टर 3' हा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात संजय एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्माता राहुल मित्रा आणि तिग्मांशु धुलिया हे 'साहेब बीवी और गँगस्टर' चा तीसरा पार्ट तयार करतायेत. या चित्रपटाची शूटिंग ऑगस्टमध्ये गुजरातमध्ये होणार आहे. निर्माता राहुल मित्राचे म्हणणे आहे की, प्रेक्षकांना या चित्रपटाची पुढील गोष्ट जाणून घ्यायची होती तसेच आम्हाला आशा आहे की चित्रपटातील संजय दत्तची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या सिरिजचा पहिला चित्रपट 2011मध्ये प्रदर्शित झाला होता. यात रणदीप हुड्डाने गँगस्टरची भूमिका साकारली होती. 2013मध्ये आलेल्या दुसऱ्या चित्रपटात गँगस्टरच्या भूमिकेत इरफान खान दिसला होता. या चित्रपटात जिम्मी शेरगिल आणि माही गिल मुख्य भूमिकेत दिसले होते. संजय दत्त सोबत या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात जिम्मी शेरगिल आणि माही गिल पण दिसणार आहेत. फिल्म समीक्षक तरुण आदर्शने ट्वीटरवरुन हि माहिती दिली. त्याच बरोबर त्यांने तिग्मांशु आणि संजय दत्तचा फोटोसद्धा पोस्ट केला आहे. सजंय दत्तने नुकतेच 'भूमी' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे तर तो सध्या टोरबाज या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्सस्त आहे. याच दरम्यान त्यांने तिग्मांशुचा चित्रपटदेखील साईन केला आहे. संजय दत्त सध्या त्याच्या बायोपिकमुळ चर्चेत आहे. त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट राज कुमार हिरानी तयार करतो आहे. यात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारतोय. संजय दत्तच्या आयुष्यातील तीन महत्त्वाचे टप्पे रणबीर मोठ्या पडद्यावर उतरवणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान एकदा संजय दत्तने सरप्राईज व्हिजीट दिली होती.