Join us  

Birthday Special : संजय दत्तला ‘बॉस’ आठवला आणि ‘महाराणी’चा जन्म झाला !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 8:00 AM

‘शोले’तील गब्बर, ‘मिस्टर इंडिया’तील मोगॅम्बो, ‘सडक’ या चित्रपटातील महाराणी आणि ‘शान’मधील शाकाल या पात्रांची नावे आजही लोक विसरलेले नाहीत. यापैकीच एक पात्र अभिनेता संजय दत्तची देण आहे.

ठळक मुद्दे1991 मध्ये ‘सडक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात संजय दत्त, पूजा भट्ट, सदाशिव अमरापूरकर मुख्य भूमिकेत होते.

एकेकाळी चित्रपटातील खलनायक नायकावर भारी पडायचे. हिंदी सिनेमाचे अनेक खलनायकांचे नाव म्हणूनच आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. ‘शोले’तील गब्बर, ‘मिस्टर इंडिया’तील मोगॅम्बो, ‘सडक’ या चित्रपटातील महाराणी आणि ‘शान’मधील शाकाल या पात्रांची नावे आजही लोक विसरलेले नाहीत. यापैकीच एक पात्र अभिनेता संजय दत्तची देण आहे. होय, ‘सडक’ या चित्रपटात सदाशिव अमरापुरकर यांनी ‘महाराणी’ हे खलनायकाचे पात्र जिवंत केले होते. संजय दत्तच्या म्हणण्यावरून हे पात्र चित्रपटात समाविष्ट करण्यात आले होते, त्याचाच हा किस्सा. आज संजय दत्तचा वाढदिवस. त्यानिमित्ताने ‘महाराणी’ या पात्राच्या जन्माची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दिग्दर्शक महेश भट्ट यांनी संजयला ‘सडक’ची स्क्रिप्ट ऐकली आणि ही स्क्रिप्ट ऐकताच संजयला त्याला भेटलेली एक व्यक्ती आठवली. होय, एकदा मुंबईच्या स्लम भागात संजयची एका  ‘रिअल विलन’ शी गाठ पडली होती. तो होता पुरूष पण त्याने महिलेसारखे कपडे घातले होते. सगळे लोक त्याला बॉस बोलवत. ‘सडक’ ची स्क्रिप्ट ऐकताच संजयच्या डोळ्यासमोर त्या ‘बॉस’चा चेहरा आला. या ‘बॉस’बद्दल संजयने महेश भट्ट यांना सांगितले. संजयला ख-या आयुष्यात भेटलेल हाच ‘बॉस’ महाराणी या नावाने पडद्यावर साकारण्यात आला.

अर्थात हे कॅरेक्टर पडद्यावर उभे करणे सोपे काम नव्हते. महाराणीचे कॅरेक्टर ‘सडक’मध्ये समाविष्ट करण्यात आले. पण ही भूमिका साकारणार कोण? असा प्रश्न महेश भट्ट यांना पडला. अखेर सदाशिव अमरापूरकर यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले. ‘अर्थसत्य’ या चित्रपटात सदाशिव यांचा अभिनय पाहून त्यांना महाराणीची भूमिका दिली गेली. महाराणी हा एक दुष्ट किन्नर होता आणि तो वेश्याव्यवसाय चालवत होता.

सदाशिव अमरापूरकर यांनी एक सुवर्णसंधी म्हणून या भूमिकेकडे पाहिले. त्यांनी संधीचे सोने करत जीवनातील सर्वोत्तम अभिनय सादर केला. या भूमिकेसाठी त्यांना  फिल्मफेअरच्या ‘बेस्ट अ‍ॅक्टर इन निगेटिव्ह रोल’ हा  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1991 मध्ये ‘सडक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात संजय दत्त, पूजा भट्ट, सदाशिव अमरापूरकर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता.

टॅग्स :संजय दत्तपूजा भट