संजय दत्त करणार आमिर खानला रिप्लेस ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 09:42 IST
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड रुजू झाला आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्यात आले आणि ...
संजय दत्त करणार आमिर खानला रिप्लेस ?
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड रुजू झाला आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्यात आले आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस ही उतरले. निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर पण आणखीन एक बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहे. रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर मिळून एक बायोपिक चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूरने आगामी चित्रपट सारे जहां से अच्छा चित्रपटासाठी आमिर खानला साइन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता अशी चर्चा आहे की आमिर खानच्या जागी संजय दत्त रिप्लेस करणार आहे. तर दुसरीकडे या चित्रपटातील एक कलाकारांने सांगितले आहे. राकेश शर्मा यांनी २ एप्रिल १९८४ साली सोयुझ टी-११ या यानातून अंतराळात जाणारे पहिले भारतीय म्हणून मान मिळविला होता. ३५ व्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी असणारे राकेश शर्मा हे भारतीय वायूदलात टेस्ट पायलट म्हणून १९७० साली सहभागी झाले. आमिर खानने स्वत:हुनच हा चित्रपट सोडला आहे. सध्या आमिर खान ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात आमिर सह बिग बी अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. ठग्स ऑफ हिस्दुस्तानमध्ये अमिताभ बच्चन आमिर खानच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. ठग्स ऑफ हिंदुस्तान 2018च्या दिवाळीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंतराळवीर कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये प्रियांका चोप्रा दिसणार आहे.