'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 17:11 IST
जळपास 21 वर्षानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. करण जोहरच्या कलंकमध्ये दोघे ...
'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार
जळपास 21 वर्षानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. करण जोहरच्या कलंकमध्ये दोघे एकत्र काम करणार आहेत. मात्र जरा थांबा, दोघे चित्रपटात एकत्र दिसणार नाहीत. होय, तुम्ही बरोबर वाचलात संजय दत्तने चित्रपटात काम करण्यासाठी एकच अट ठेवली आहे की तो माधुरीसोबत चित्रपटात एकाही सीनमध्ये एकत्र शूटिंग करणार नाही. केआरके बॉक्स ऑफिसने जे ट्वीट केले आहे त्यानुसार, संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत एकही सीन शूट न करण्याच्या अटीवर चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. करण जोहर लवकरच ही गोष्ट उघड करेल.काही दिवसांपूर्वी माधुरी संजय दत्तबाबत बोलली होती. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार माधुरीने म्हटले होते की, व्यक्ती म्हणून संजय दत्त खूप चांगला आहे. त्याच्याकडे एक सुंदर ह्रदय आहे आणि हसण्याची कलासुद्धा आहे. तो मला खूप हसवायचा. तो मोकळ्या मनाचा आणि समजूतदार व्यक्ती आहे. करण जोहर , साजिद नाडियाडवाला आणि अपूर्व मेहता निर्मित हा चित्रपट अभिषेक बर्मन दिग्दर्शित करणार आहे. या मेगास्टारर चिपटात माधुरी व संजयशिवाय सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरूण धवन आणि आदित्य राय कपूर यांची वर्णी लागली आहे. पुढील वर्षी १९ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होईल.१९९३ मध्ये सुभाष घर्इंच्या ‘खलनायक’ मध्ये संजय व माधुरीची जोडी अखेरची एकत्र दिसली होती. पण यानंतर या दोघांनीही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. आता यामागची पार्श्वभूमी सगळ्यांनाच ठाऊक आहे. याकाळात संजय व माधुरीच्या अफेअरच्या चर्चा उठल्या होत्या. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन संजय माधुरीसोबत लग्न करणार, इथपर्यंत चर्चा होती. पण ‘खलनायक’ रिलीज होण्यापूर्वीच संजय दत्त टाडा केसमध्ये तुरूंगात गेला आणि माधुरीने संजयपासून अंतर राखणे सुरु केले. संजय तुरुंगातून सुटून बाहेर आल्यावरही माधुरी त्याला भेटली नाही. दोघांमधील अंतर इतके वाढले की,त्यांनी एकमेकांसोबत चित्रपट करणेही बंद केले.पण आता तो भूतकाळ झाला....