Join us  

‘मेरी बेइज्जती मत किजिए...’;‘केजीएफ 2’टीमला असे का म्हणाला संजय दत्त? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 1:08 PM

वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

ठळक मुद्देयावर्षी ऑगस्ट महिन्यातच संजय दत्तने सोशल मीडियावर आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते.

साऊथ सुपरस्टार यश याचा आगामी सिनेमा ‘केजीएफ 2’ची सध्या जोरदार चर्चा आहे, सोबत प्रतीक्षाही. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या सिनेमात झळकणार म्हटल्यावर तर चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संजय दत्त नुकताच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत, ‘केजीएफ 2’च्या शूटींगला पोहोचला. या सिनेमाचा एक क्लायमॅक्स फाईट सीन त्याने शूट केला. हा सीन शूट करताना संजूबाबाचे दृढनिश्चय पाहून सेटवरचा प्रत्येकजण स्तब्ध झाला.

बॉलिवूड हंगामाने एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्त सेटवर पोहोचला, पण त्याच्या प्रकृतीबद्दल सगळेच चिंतीत होते.   सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु होती. अशात यश आणि चित्रपटाचा दिग्दर्शक प्रशांत नीलने संजयचे स्टंट थोडे सोपे ठेवण्यास सांगितले. संजूबाबा यावर काय म्हणाला माहितीये? मेरे स्टंट सीन आसान करो, कहकर मेरी बेइज्जती मत करिए. मैं उन्हे ठीक वैसे ही करूंगा, जैसे उन्हे लिखा गया है. ना कोई कॉम्प्रोमाइज और ना कोई चीटींग....असे बाबा म्हणाला आणि त्याचे हे शब्द ऐकून सगळेच स्तब्ध झालेत.

ज्या ठिकाणी शूूट होते, त्या लोकेशनवर खूप सारी माती होती. त्यामुळे संजयसाठी ही जागा झाडून एकदम स्वच्छ व सॅनिटाईन करण्याचे आदेशही दिग्दर्शकाने दिलेत. पण संजूबाबाने यालाही विरोध दिला. ऐसा मत करो भाई, लोक बहुत दीमाग वाले हैं. साफसुथरे सीन स्क्रिनपर देख बिथर जायेंगे,' असे तो म्हणाला.  क्लायमॅक्स सीनसाठी कोळशाच्या खाणीत बरेच अ‍ॅक्शन सीन शूट होणार होते. निर्मात्यांनी संजय दत्तची हेल्थ रिकव्हरी बघता त्याला बॉडी डबल घेण्याचा सल्ला दिला होता. पण संजय दत्तने यासाठी नकार दिला. त्याने स्वत: अ‍ॅक्शन सीन्स केलेत. एकंदर काय तर संजूबाबाने ‘केजीएफ 2’च्या अख्ख्या टीमला चांगलेच इम्प्रेस केले. संजय दत्त रिअल हिरो आहे, सच्चा लढवय्या आहे, याची खात्री सर्वांना पटली.

यावर्षी ऑगस्ट महिन्यातच संजय दत्तने सोशल मीडियावर आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते.  संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे निदान होताच कुटुंबासोबतच चाहतेही बाबाच्या काळजीने चिंतीत होते. पण बाबाची इच्छाशक्ती जबरदस्त होती. मी कॅन्सरला हरवणारच, हा इरादा पक्का होता. त्यानुसार, संजूबाबाने कॅन्सरला मात दिली.

कॅन्सरला मात देणाऱ्या संजूबाबाचा नवा लूक पाहिलात?  क्षणात व्हायरल झालेत फोटो 

टॅग्स :संजय दत्तकेजीएफ