Join us  

संजय दत्तच्या मुलांना खेळात मिळाले सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 5:26 PM

संजय दत्त आपल्याला काही दिवसांपूर्वी आलेल्या 'कलंक' सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 'कलंक'नंतर संजय दत्त आपल्याला 'सडक 2' मध्ये दिसणार आहे.

ठळक मुद्देसंजय दत्त आणि मान्यता देखील स्वीमिंगमध्ये पारंगत आहेत 'केजीएफ 2’मध्ये संजय दत्तची वर्णी लागली आहे

संजय दत्त आपल्याला काही दिवसांपूर्वी आलेल्या कलंक सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. कलंकनंतर संजय दत्त आपल्याला 'सडक 2' मध्ये दिसणार आहे. संजय दत्त कित्ती ही व्यस्त असला तरी आपल्या बिझी शेड्यूलमधून मुलांसाठी आवर्जून वेळ काढतो. काही दिवसांपूर्वी शाहरान आणि इकराला आंतर शालेय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. संजय दत्त आणि मान्यता देखील स्वीमिंगमध्ये पारंगत आहेत.      

रिपोर्टनुसार 'केजीएफ 2’मध्ये संजय दत्तची वर्णी लागली आहे. ‘केजीएफ2’मध्ये संजय एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल, असे कळतेय. अर्थात अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण ‘केजीएफ2’मध्ये संजयची वर्णी लागलीच तर बाबासाठी ही मोठी संधी ठरणार आहे.  ‘केजीएफ- चार्प्टर 1’ने वर्ल्डवाईड १५० कोटींचा बिझनेस केला होता. केजीएफ’चे हिंदी व्हर्जन फरहान अख्तरने प्रोड्यूस केले होते. कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषेत हा चित्रपट रिलीज झाला. 

याशिवाय संजय दत्त ‘सडक 2’मध्ये सुद्धा दिसणार आहे. संजय दत्तसह पूजा भट्ट, आदित्य राय कपूर आणि आलिया भट्ट अशी जबरदस्त स्टारकास्ट असणार आहे. २५ मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. १९९१ मध्ये ‘सडक’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. 

टॅग्स :संजय दत्त