Join us

​सलमानसोबत संगीता बिजलानी!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 16:08 IST

सध्या ‘ सुल्तान’मध्ये बिझी असलेला सलमान लवकरच एका दक्षिण चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सल्लूसोबत त्याची एक्स गर्लफ्रेन्ड ...

सध्या ‘ सुल्तान’मध्ये बिझी असलेला सलमान लवकरच एका दक्षिण चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सल्लूसोबत त्याची एक्स गर्लफ्रेन्ड अर्थात संगीता बिजलानी हिची वर्णी लागणार असल्याची खबर आहे.  साजीद नाडियाडवाला दक्षिण चित्रपट ‘क्षणम’चा रिमेक बनवणार आहेत. हा चित्रपट म्हणजे एक प्रियकर आणि तिच्या एक्स गर्लफ्रेन्डची कहानी आहे. एक्स गर्लफे्रन्डच्या मुलीचे अपहरण होते आणि हा प्रियकर तिच्या मदतीला पोहोचतो, असा चित्रपटाचा प्लॉट आहे. या चित्रपटाला दक्षिणेत अमाप यश मिळाले होते. या चित्रपटात सलमान दिसणार असल्याची खबर आहे. विशेष म्हणजे, यात त्याची एक्स गर्लफ्रेन्ड म्हणून दिसणार आहे ती, रिअल लाईफ एक्स,संगीता बिजलानी. या चित्रपटाच्या निमित्ताने संगीता पुन्हा एकदा चित्रपटात पुनरागमन करणार आहे. तिच्या पुनरागमनासाठी हा चित्रपट म्हणजे अगदी परफेक्ट असल्याचे मानले जात असो. याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही, पण सल्लू-संगीता एकत्र आले तर पैसा वसूल, हे नक्की, तेव्हा बघूयात!!!