दीपिकाचा चाहत्यांना संयमाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 18:15 IST
‘ट्रिपल एक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ म्हणजे दीपिका पदुकोणचा पहिलावहिला हॉलिवूडपट. काल-परवा या चित्रपटाचा टीजर ट्रेलर रिलीज झाला ...
दीपिकाचा चाहत्यांना संयमाचा सल्ला
‘ट्रिपल एक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ म्हणजे दीपिका पदुकोणचा पहिलावहिला हॉलिवूडपट. काल-परवा या चित्रपटाचा टीजर ट्रेलर रिलीज झाला आणि दीपिकाच्या चाहत्यांची कमालीची निराशा झाली. कारण टीजर ट्रेलरमध्ये दीपिका केवळ नाममात्र दिसली. १ मिनिट २४ सेकंदाच्या या टीजर व्हिडिओमध्ये केवळ आणि केवळ विन डिजल व सॅम्युएल एल जॅकसन हे दोघेच दिसले. याऊलट दीपिका अगदी काही सेकंद झळकली. अशास्थितीत दीपिकाचे चाहते नाराज होणे स्वाभाविक होते. चाहत्यांची ही नाराजी नेमकी दीपिकापर्यंत पोहोचली. मग काय?? चाहत्यांची ही नाराजी दूर करीत दीपिकाने त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. संयम ठेवा. चित्रपट रिलीज व्हायला अद्याप सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ आहे.‘ट्रिपल एक्स’ शृंखलेतील हा तिसरा चित्रपट अनेक वर्षांनंतर येत आहे. चित्रपट जेंडर केज(विल डीजल)च्या वापसीवर आहे. त्यावरच ट्रेलर आधारित आहे. हळूहळू अनेक नव्या गोष्टी समोर येतील. येत्या दिवसात आणखी बरेच काही पाहायला मिळणार आहे, असा संदेश तिने चाहत्यांना दिला. ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ पुढील वर्षी २० जानेवारीला रिलीज होतोय, अशास्थितीत दीपिकाच्या म्हणण्यात तथ्य आहे. तुम्हालाही पटतयं ना??