Join us

सलमान दिसणार रेमो डिसूजाच्या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 12:01 IST

ट्यूबलाइटनंतर सलमान खान रेमो डिसूजाच्या डान्सवर आधारित चित्रपटाची तयारी करणार आहे. सध्या सलमान त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रेमोच्या ...

ट्यूबलाइटनंतर सलमान खान रेमो डिसूजाच्या डान्सवर आधारित चित्रपटाची तयारी करणार आहे. सध्या सलमान त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रेमोच्या चित्रपटात काम करण्यासाठी सलमान वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचे ट्रेनिंग घेतो आहे. रेमोने हा डान्सवर आधारित चित्रपट असल्याचे कंन्फर्म केले आहे. तसेच या चित्रपटासाठी सलमान नवीन डान्स स्टाईल पण शिकतो आहे. सलमनाची ही नवी डान्स स्टाईल बघून त्याचे फॅन्स सरप्राईज होतील. मात्र याबाबत अजून काही खुलासा त्यांने केला नाही.   सलमान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याचा ट्यूबलाईट हा चित्रपट 23 जूनला रिलीज होणार आहे. जसा सलमान फ्री होईल तसा मी त्याच्याशी चित्रपटाच्या डेट्सबाबत चर्चा करणार आहे. काही दिवसांपूर्वी अशी खबर आली होती की या चित्रपटात सलमानच्या अपोझिट जॅकलिन फर्नांडिस झळकणार आहे. मात्र रेमोने ही गोष्ट नाकारली आहे. लवकरच या चित्रपटातील हिरोईनचं नाव फायनल करण्यात येईल असे तो म्हणाला. रेमो डान्सवर आधारित चित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षी सुरु होणार आहे.  एका डान्सर पिता आणि त्याच्या 13 वर्षीय महत्त्वकांक्षी मुलीची ही गोष्ट आहे. या चित्रपटात सलमान 13 वर्षांच्या मुलीच्या वडिलांची भूमिका करणार आहे. सलमानचा ट्यूबलाइटनंतर 'टायगर जिंदा है' हा चित्रपट येणार आहे. 'टायगर जिंदा है' हा एक था टागरचा सीक्वल आहे. याचित्रपटात सलमान सोबत कॅटरिना कैफ ही झकळणार आहे. तब्बल 5 वर्षानंतर सलमान आणि कॅटची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. याशिवाय अतुल अग्निहोत्रीच्या आगामी चित्रपटात ही जोडी दिसणार असल्याचे समजते आहे.