Join us

सलमान-शाहरूख ‘कोल्ड वॉर’ पुन्हा सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 23:18 IST

 सलमान खानचा ‘सुल्तान’ आणि शाहरूखचा ‘रईस’ हा चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहे, हे तर आपल्याला माहित आहे. त्यांचे ...

 सलमान खानचा ‘सुल्तान’ आणि शाहरूखचा ‘रईस’ हा चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहे, हे तर आपल्याला माहित आहे. त्यांचे फॅन्स देखील त्यांच्यातील संघर्षाला बॉक्स आॅफीसमधील ‘वर्ल्ड वॉर ३’ म्हणत आहेत. सलमान किंवा शाहरूख दोघेही त्यांचे चित्रपट पुढे ढकलण्याच्या तयारीत नाहीत.सुल्तानचा निर्माता आदित्य चोप्राने दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना ईदच्या अगोदरच चित्रपट संपवण्याची ताकीद दिली आहे. सलमान देखील त्याच्या टीमला संपूर्ण मदत करत आहे. तर दुसरीकडे निर्माता रितेश सिद्धवानी देखील ईदलाच चित्रपट रिलीज करण्याच्या दृष्टीकोनातून हालचाली सुरू केल्या आहेत. वेल, सलमान -शाहरूख तुमच्यातील कोल्ड वॉर सुरू राहू द्या...चित्रपटाची गरज आहे ती...!