Join us  

रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नात शाहरुख-सलमान नाही तर हे असणार VVIP गेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 4:11 PM

बॉलिवूड कलाकार रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे.

Richa Chadha Ali Fazal Wedding: बॉलिवूड कलाकार रिचा चड्ढा (Richa Chaddha) आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. बऱ्याच दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे हे दोन्ही कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाबाबत अनेक बातम्या आल्या आहेत. आता या लग्नात व्हीआयपी पाहुणे येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिचा आणि अलीच्या लग्नाला हॉलिवूड स्टार्स येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लवकरच लग्नासाठी होणार रवाना अली फजलसोबत काम केलेले  गेरार्ड  बटलर आणि जुडी डेंच सारखे हॉलिवूड सेलिब्रिटी अली आणि ऋचा चढ्ढा यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. रिचा आणि अलीच्या लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अभिनेता लवकरच यासाठी दिल्लीला रवाना होणार आहे.

रिपोर्टनुसार, मुंबईत रिसेप्शनसाठी निमंत्रितांमध्ये अली फजलचा 'व्हिक्टोरिया अँड अब्दुल'मधील सहकलाकार डेम जुडी डेंच आणि जेरार्ड बटलर यांचाही समावेश आहे, जो अली सोबत आगामी हॉलिवूड चित्रपटा 'कंधार'मध्ये दिसणार आहे.

4 ऑक्टोबरला होणार लग्न दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, रिचा आणि अली ४ ऑक्टोबरला लग्न करणार आहेत. हे लग्न दिल्लीच्या जिमखाना क्लबमध्ये होणार असून त्यानंतर दिल्लीतच मोठे रिसेप्शन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर हे कपल मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही ठेवण्याची शक्यता आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, रिचा चड्ढा सध्या तिच्या आगामी 'हिरामंडी' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे, ज्याचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. अली फजलबद्दल सांगायचे तर तो त्याच्या 'मिर्झापूर' या सुपरहिट वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग करत आहे.

टॅग्स :रिचा चड्डाअली फजलसेलिब्रिटी