सलमान-लुलिया एकत्र दुबईला...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 23:02 IST
सलमान खान आणि लुलिया वंतुर हे रिलेशनशिपमध्ये असले तरी त्यांनी त्यांचे नाते अद्याप अधिकृतपणे स्विकारलेले नाही. लुलिया वंतुरचा वाढदिवस ...
सलमान-लुलिया एकत्र दुबईला...!
सलमान खान आणि लुलिया वंतुर हे रिलेशनशिपमध्ये असले तरी त्यांनी त्यांचे नाते अद्याप अधिकृतपणे स्विकारलेले नाही. लुलिया वंतुरचा वाढदिवस असल्याने तो तिला सरप्राईज गिफ्ट देणार आहे. पण नुकत्याच कळालेल्या माहितीनुसार, हे दोन लव्हबर्ड म्हणे दुबईला एकत्र वाढदिवस साजरा करणार आहेत. ते दोघे एकत्र एअरपोर्टवर भेटलेले दिसले असता तिथून एका चाहत्याने त्यांचा सोबत थांबलेला फोटो काढला. त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल काहीही सांगितले नसले तरीही जणू काही ते असे म्हणत आहेत की,‘ अ पिक्चर स्पिक्स अ थाऊजंड वर्ड्स.’