Join us  

असे असणार पठाण आणि टायगर 3 चे कनेक्शन, सलमान खान आणि शाहरुख खानच्या फॅन्ससाठी गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 2:05 PM

पठाण या चित्रपटाद्वारे तो कमबॅक करणार आहे. तर सलमानचा टायगर 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ठळक मुद्देपठाण हा चित्रपट जिथे संपणार, त्याच्यापुढे टायगर 3 या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. पठाण आणि टायगर 3 या चित्रपटाची कथा एकमेकांशी निगडित असणार आहे.

शाहरुख खानचा फॅन हा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला होता. यानंतर शाहरुख कोणत्याच चित्रपटात दिसला नाही. आता पठाण या चित्रपटाद्वारे तो कमबॅक करणार आहे. तर सलमानचा टायगर 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटात सलमान खान छोट्याशा पण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि आता तर पठाण आणि टायगर 3 चे खास कनेक्शन असणार आहे.

बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, पठाण हा चित्रपट जिथे संपणार, त्याच्यापुढे टायगर 3 या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. पठाण आणि टायगर 3 या चित्रपटाची कथा एकमेकांशी निगडित असणार आहे. पठाण या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर सलमान टायगर 3 या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. 

टायगर 3 या चित्रपटात सलमानसोबतच कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. या चित्रपटात ती हाणामारीची दृश्यं देणार आहे. 

पठाण या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख या चित्रपटात एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका देखील एका एजंटच्या भूमिकेत असणार असून ती शाहरुख खानसोबत मिशनवर काम करते असे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या पात्रासाठी अनेक लूकचा विचार केला गेल्यानंतर अखेर दीपिकाच बॉय कटसाठी (शॉर्ट हेअर) तयार झाली. त्यामुळे या सिनेमात दीपिका शॉर्ट हेअरमध्ये दिसणार आहे.

टॅग्स :सलमान खानशाहरुख खानदीपिका पादुकोणकतरिना कैफ