सलमान खानसोबत ‘तेरे नाम’मध्ये वेड्या मुलीची भूमिका साकारणारी ‘ही’ तरुणी दिसतेय इतकी हॉट, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 16:50 IST
सुपरस्टार सलमान खान याची लव्ह लाइफ सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. आयुष्याच्या एका वळणावर जेव्हा तो त्याच्या प्रेमप्र्रकरणामुळे वादाच्या भोवºयात ...
सलमान खानसोबत ‘तेरे नाम’मध्ये वेड्या मुलीची भूमिका साकारणारी ‘ही’ तरुणी दिसतेय इतकी हॉट, पाहा फोटो!
सुपरस्टार सलमान खान याची लव्ह लाइफ सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. आयुष्याच्या एका वळणावर जेव्हा तो त्याच्या प्रेमप्र्रकरणामुळे वादाच्या भोवºयात सापडला तेव्हा त्यातून तो सावरणार काय, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांकडून उपस्थित केला गेला. मात्र सलमानने यातून मार्ग काढत मोठ्या पडद्यावर दमदार पर्दापण केले. त्यावेळी त्याने ‘तेरे नाम’ या चित्रपटातून कमबॅक केले. त्याचा हा चित्रपट त्यावेळी चांगलाच हिट ठरला. विशेषत: चित्रपटातील त्याची हेअर स्टाइल त्यावेळी खूप प्रसिद्ध झाली होती. त्याचबरोबर सलमानसोबत मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री भूमिका चावला हिलादेखील रातोरात स्टारडम मिळाले होते. सलमानसोबतची तिची केमिस्ट्री त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात आणखी एक तरुणी बघावयास मिळाली होती. होय, सलमानसोबत वेड्याची भूमिका साकारणाºया त्या तरुणीविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण ही तरुणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून, तिचा हॉट अंदाज यूजर्सला प्रेमात पाडत आहे. रोशनी चौधरी असे नाव असलेल्या या तरुणीने बॉलिवूडमध्ये तीसपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ‘तेरे नाम’ हा चित्रपट तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला आहे. कारण ज्या पद्धतीने भूमिकाला या चित्रपटाने स्टारडम मिळवून दिले, काहीसे तसेच स्टारडम रोशनीलाही मिळवून दिले. या चित्रपटामुळे तिला बॉलिवूडमध्ये अनेक आॅफर्स मिळू लागल्या. शिवाय तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्याही वाढू लागली. रोशनी दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने हिंदीसह तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘तेरे नाम’ आणि ‘खुशी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी रोशनी २००४ नंतर अचानक गायब झाली. पडद्यावर काम करण्यापेक्षा तिने पडद्यामागे काम करायला सुरु वात केली. दिग्दर्शक म्हणून तिने काम सुरू केले पण त्यातही तिला मोठे यश मिळाले नाही.