Join us

hurry up!!​ ‘ट्यूबलाईट’मधील सलमान खानच्या ‘त्या’ जोड्यांचा होणार लिलाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 15:47 IST

सध्या सगळीकडे सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’चीच चर्चा आहे. सलमानच्या चाहत्यांना ‘ट्यूबलाईट’चा भलताच ज्वर चढला आहे. सलमानची एक झलक पाहण्यासाठी सगळे ...

सध्या सगळीकडे सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’चीच चर्चा आहे. सलमानच्या चाहत्यांना ‘ट्यूबलाईट’चा भलताच ज्वर चढला आहे. सलमानची एक झलक पाहण्यासाठी सगळे आतूर आहेत. अशात आम्ही तुमच्यासाठी एक खास खबर घेऊन आलो आहोत. ही खबर ऐकल्यानंतर तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल. अर्थात तुम्ही सलमानचे खरे चाहते असाल तर. शिवाय तुमच्या जवळ खूप पैसा असेल तरच. आता सलमानचे चाहते असण्याचा आणि खूप पैसा असण्याचा काय संबंध, असे तुम्ही विचाराल. तर तेच आम्ही सांगतोय. होय, सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ या आगामी चित्रपटातील एका वस्तूचा  लिलाव होणार आहे. ऐकता ते खरे आहे, ही वस्तू म्हणजे सलमानच्या गळ्यातील बूट. होय, ‘ट्यूबलाईट’मध्ये हे बूट गळ्यात लटकून सलमान फिरताना दिसतो आहे. याच बुटांचा लिलाव होणार आहे. जो सर्वाधिक पैसे देईल, सलमानचे जोडे त्याचेच. सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसने हा निर्णय घेतला आहे. या लिलावातून जो पैसा उभा राहील तो, सलमानची एनजीओ ‘बीर्इंग ह्युमन’च्या खात्यात जाईल. हा पैसा गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरला जाईल.सलमान खान ‘ट्यूबलाईट’मध्ये जे बूट गळ्यात घालून फिरताना दिसतोय, ते सोहेल खानचे आहेत. याचे कारण म्हणजे, सोहेल खान हरवला आहे. त्याची ओळख पटावी, यासाठी सलमानकडे काहीही नाही. मग काय, हे सोहेलचे जोडे तेवढे आहेत. ‘ट्यूबलाईट’मध्ये सोहेल खान सलमानच्या लहान भावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या ईदच्या मुहूर्ताला हा चित्रपट रिलीज होतो आहे. त्यापूर्वी सलमानचे डाय हार्ट फॅन असाल तर त्याचे हे जोडे तुम्ही मिळवू शकता.