Join us

​सलमान खानची एक्स-मॅनेजर करणार ऐश्वर्या राय बच्चनसाठी काम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 15:59 IST

सध्या एक बातमी बी-टाऊनमध्ये वा-यासारखी पसरली आहे. ऐश्वर्या राय बच्चनने म्हणे सलमान खानची पूर्वाश्रमीची मॅनेरज रेशमा शेट्टी हिला कामावर ...

सध्या एक बातमी बी-टाऊनमध्ये वा-यासारखी पसरली आहे. ऐश्वर्या राय बच्चनने म्हणे सलमान खानची पूर्वाश्रमीची मॅनेरज रेशमा शेट्टी हिला कामावर ठेवले आहे. आता ऐश्वर्याला रेशमा शेट्टीच का हवी, यामागे कारण आहे अभिषेक बच्चन. होय,अभिषेकचे करिअर सध्या गटांगळ्या खात आहे, हे सगळेच जाणतात. त्यामुळे यास्थितीत अभिषेकच्या करिअरला टेकू देणे अतिशय गरजेचे आहे. ऐश्वर्याने म्हणे, हिच गरज ओळखून रेशमा शेट्टी हिला कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी रेशमा सलमानसाठी काम करायची. तब्बल नऊ वर्षे तिने सलमानसाठी काम केले. पण मध्यंतरी रेशमा अन सलमानमध्ये कशावरून तरी बिनसले आणि सलमानने रेशमाला  बाहेरचा रस्ता दाखवला. त्यावेळी दोघांच्या नात्यात चांगली ताणाताणी निर्माण झाल्याची चर्चाही पसरली होती. सध्या रेशमाला काम हवे आणि ऐश्वर्याला तिच्यासारखी अनुभव असलेली व्यक्ति. याच गरजेतून ऐश्वर्या व रेशमाचे व्यावसायिक संबंध जुळण्याची शक्यता आहे. आता हे संबंध जुळलेच तर अभिषेकचे करिअरला किती गती मिळती, तेच बघण्यासारखे आहे. ALSO READ : हा अभिनेता आजारी पडल्यामुळेच सलमान खानला मिळाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेकतुम्हाला आठवत असेल तर याच रेशमामुळे मध्यंतरी सलमान आणि संजय दत्त यांचे बिनसल्याची बातमी आली होती.  संजय डिसेंबर २०१४ मध्ये पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता, तेव्हा सलमानने त्याला रेशमाला नोकरीवर ठेवण्याचा सल्ला दिला होता. संजयला आपली प्रतीमा सुधारण्यासाठी रेशमाची मदत होईल, असे सलमानने मत होते. साहजिक सलमानचा सल्ला मानून संजयने रेशमाला नोकरीवर ठेवले होते. मात्र रेशमाला कामावर ठेवल्याच्या अनेक महिन्यानंतरही संजयला एकही प्रोजेक्ट मिळाला नाही. याचे कारण म्हणजे रेशमाने संजयची प्राईज अव्वाच्या सव्वा वाढवून टाकली होती. यामुळे कुठलाही निर्माता संजयला घेण्याचा विचारही करू शकत नव्हता. हे कळल्यानंतर  संजय जाम चिडला होता आणि त्याने रेशमाची हकालपट्टी केली होती. सूत्रांच्या मते, ही गोष्ट सलमानच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. संजयने रेशमाचा अनादर केला, असे सलमानला वाटू लागले होते. पण पुढे रेशमा आणि सलमानमध्येही वाजले. आता हीच रेशमा ऐश्वर्यासाठी काम करणार आहे म्हटल्यावर तिच्याकडे लक्ष असेलच.