Join us

​‘ट्युबलाईट’च्या ट्रेलरनंतर सलमान खानच्या चाहत्यांचा ढोल-ताशांसह एकच जल्लोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 11:38 IST

सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे ट्रेलर काल मुंबईत लॉन्च झाले. यानंतर सगळ्यांच्या ओठांवर केवळ सलमानचेच नाव होते. सलमानचे चाहते इथेच थांबले नाहीत तर आपल्या आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी ढोल-ताशे घेऊन पोहोचले.

सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे ट्रेलर काल मुंबईत लॉन्च झाले. रात्री ९ वाजता दिग्दर्शक कबीर खानसोबत सलमानने आॅनलाईन ट्रेलर लॉन्च केले. यानंतर सगळ्यांच्या ओठांवर केवळ सलमानचेच नाव होते. सलमानचे चाहते इथेच थांबले नाहीत तर  आपल्या आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी ढोल-ताशे घेऊन पोहोचले. सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटस्थित घराबाहेर सलमानच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चाहत्यांचा हा जल्लोष आणि प्रेम पाहून मग काय, सलमानही घराच्या बाल्कनीत आला आणि चाहत्यांच्या आनंदात सामील झाला. चाहत्यांना त्याने मनापासून अभिवादन केले. सलमान बाल्कनीत येताच चाहत्यांनी एकच गलका केला. सगळे सलमान...सलमान...म्हणून ओरडू लागले. सलमानच्या घराबाहेरचे हे वातावरण अद्भूत होते. सलमानही चाहत्यांचे हे प्रेम पाहून आश्चर्यचकित झाला. या क्षणाचा एक व्हिडिओ सलमानने त्याच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केला आहे. #StarGoldKiTubelight is shining very bright! Thanks for bringing me so much love from my fans @StarGoldIndia! असे त्याने लिहिले आहे.}}}}सलमानच्या ‘ट्युबलाईट’ या चित्रपटाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ एक वॉर ड्रामा मुव्ही आहे. १९६२मध्ये भारत-चीनदरम्यान झालेल्या युद्धादरम्यानची कथा यात साकारली आहे. सलमानशिवाय या चित्रपटात चीनी अभिनेत्री झू झू, सोहेन खान आणि दिवंगत ओम पुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘ट्युबलाईट’च्या ट्रेलरविषयी बोलायचे झाल्यास, सुरुवातच आर्मीच्या अनाउंसमेंटने होते.  भारताच्या बॉर्डरवर परिस्थिती नाजूक असल्याने प्रत्येक तरुणाने सैन्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले जाते. याच ठिकाणी सलमानची झलक बघावयास मिळते. सलमानला बघताच चेहरा प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही. ALSO READ : Watch Trailer : प्रतीक्षा संपली; रिलीज झाला सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चा दमदार ट्रेलर!!जेव्हा एक मुलगा सलमानला ‘ट्युबलाईट’ म्हणतो तेव्हा तो खूपच निरागसतेने माझे नाव ‘ट्युबलाईट’ नसून लक्ष्मण असल्याचे सांगतो. याचदरम्यान सोहेल खान म्हणजेच चित्रपटातील सलमानचा भाऊ भरतला दाखविले जाते. लक्ष्मणला भाऊ भरतवर खूप विश्वास असतो. दोघांमधील केमिस्ट्री खूपच चांगली असते. अशात भरत भारतीय सैन्यात सहभागी होतो, मात्र त्याचा काही ठावठिकाणा लागत नसल्याने लक्ष्मण त्याच्या शोधात निघतो. लोक त्याला ‘ट्युबलाईट’ म्हणून हिणवतात, तुझा भाऊ परत येणार नाही असे सांगतात, परंतु लक्ष्मणचा विश्वास असतो की, तो त्याच्या भावाला परत आणणारच.