चित्रपट रेस ३ बद्दल दिग्दर्शक रेमो डिसुझाला विचारले असता त्याने मीडियाला सांगितले "लोकांनी आतापर्यंत जी रेसची सीरिज बघितली आहे. त्याच्यापेक्षा हा चित्रपट हटके असणार आहे. आमचा हाच प्रयत्न असेल की चित्रपटातील प्रत्येक सीन भव्य दिव्य असवा ज्याने चित्रपट बघायला आलेल्या प्रेक्षकांना नवीन आणि वेगळा अनुभव मिळेल."ह्याआधीच्या चित्रपटाचे पहिले शूटिंग अबु धाबीमध्ये होणार होते. पण सलमान खानचे व्यस्त शेड्युल बघता मेकर्सनी प्लॅन बदलला आता ह्या चित्रपटाचे पहिले शूटिंग मुबंईमध्ये होणार आहे. हा चित्रपट मेकर्सला २०१८च्या ईदला रिलीज करायचा आहे त्यामुळे त्यांची इच्छा आहे की हा चित्रपट लवकरात लवकर पूर्ण हावा. यात जॅकलिन फर्नांडिसही दिसणार आहे. ALSO READ : जेव्हा अडचणीत होता सलमान खान तेव्हा याचे नाव घेतले अन् झाला सुपरस्टार!कॅटरिना कैफ आणि सलमान खानच्या जोडीचा टायगर जिंदा है चित्रपट ख्रिसमच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटातील गाणं सलमान आणि कॅटरिना ग्रीसमध्ये शूट करुन आले आहे. तब्बल पाच वर्षांनी दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टायगर जिंदा है हा चित्रपट २०१२ मध्ये आलेला एक था टायगरचा सिक्वेल आहे.#Race3 Shoot beings on 9th November!! Here are some photos from the set. More updates to follow soon. #Eid2018@RameshTaurani@remodsouzapic.twitter.com/k713BiaVUf— Tips Films & Music (@tipsofficial) November 1, 2017
सलमान खान 'रेस ३'च्या शूटिंगला नोव्हेंबरमध्ये होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 10:14 IST
तुमच्या लक्षात असेल काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितले होते कि सलमान खान त्याच्या रेस ३ चे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू करणार ...
सलमान खान 'रेस ३'च्या शूटिंगला नोव्हेंबरमध्ये होणार सुरुवात
तुमच्या लक्षात असेल काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितले होते कि सलमान खान त्याच्या रेस ३ चे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू करणार आहे. आता आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार रेस ३ ची शूटिंग ९ नोव्हेंबरला सुरू होणार असल्याचे समजते. टिप्स फिल्मस जी या चित्रपटाची निर्मिती करते आहे. त्यांनी याची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे कि, रेस ३ चे शूटिंग ९ नोव्हेंबरपासून सुरु करणार आहे. सोबतच त्यांनी काही सेटवरचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत. सेटवरच्या ह्या फोटोला बघता हे मात्र निश्चित की मेकर्सने सांगितल्या प्रमाणे हा चित्रपट बिग बजेट असेल. ह्या चित्रपटाचा भव्य दिव्य सेट बघून कळते की ह्यात डान्स आणि एक्शनचे सीन्स शूट होणार आहेत.