सलमान खानला, तू रिलेशनशिपमध्ये कोणासोबत राहतो? असे विचारले असता त्याने हे उत्तर दिले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 19:20 IST
सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, तो अनेक टीव्ही कार्यक्रम आणि प्रेस कॉन्फरंसला सामोरे जात आहे. अशात त्याच्या खासगी आयुष्याचा उलगडा होत असल्याने सलमान खानला जाणून घेण्याची संधीच चालून येत आहे.
सलमान खानला, तू रिलेशनशिपमध्ये कोणासोबत राहतो? असे विचारले असता त्याने हे उत्तर दिले!
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हे एक असे कोडे आहे की, ज्याला उलघडणं सहजासहजी कोणालाही शक्य होत नाही. कारण एखाद्याला जर असे वाटत असेल की, तुम्ही सलमान खानविषयी सगळं काही जाणून आहात तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे, असे म्हणावे लागेल. असो, सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, तो अनेक टीव्ही कार्यक्रम आणि प्रेस कॉन्फरंसला सामोरे जात आहे. अशात त्याच्या खासगी आयुष्याचा उलगडा होत असल्याने सलमान खानला जाणून घेण्याची संधीच चालून येत आहे. त्याने नुकतीच बॉलिवूड लाइफ या वेबसाइटला भेट दिली असता, त्याने रिलेशनशिपविषयीचा मोठा खुलासा केला आहे. वास्तविक या वेबसाइटने सलमानसोबत एक गेम खेळला, ज्यामध्ये सलमानशी निगडीत बरेचसे असे प्रश्न आहेत जे गुगलवर सर्वाधिक सर्च केले जातात. त्यातीलच एक प्रश्न सलमानच्या रिलेशनशिपविषयीचा होता. त्याचेच उत्तर देताना त्याने हा खुलासा केला. ‘सलमान खान सध्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे?’ असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला. त्यावर भाईजानने उत्तर दिले; होय, मी नेहमीच रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे. परंतु यापुढे उत्तर देण्यास त्याने नकार दिला. तसेच तो कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, याचेही उत्तर दिले नाही. मात्र जर त्याने एका वाक्यात ‘मी माझ्या रोमानियन गर्लफ्रेंड यूलिया वंतूर हिच्याशी रिलेशनशिपमध्ये आहे, असे सांगितले असते तर?’ असो याचे उत्तर जरी सलमानने दिले नसले तरी, त्याचे चाहते सलमानच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यास नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. यानंतर सलमानला दुसºया प्रश्नात ‘सलमान खान कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक प्रेम करतो?’ असे विचारण्यात आले. यावर सलमानचे उत्तर होते. ‘मी प्रामाणिकपणे सर्वाधिक प्रेम करतो यापेक्षा अधिक काहीच नाही’ सलमानचे हे उत्तर सगळ्यांनाच पटणारे आहे. कारण त्याचा हा गुण कदाचित सर्वांनाच माहिती असावा. कारण इंडस्ट्रीमध्ये सलमान जे काही करतो, ते मनापासून करतो. सलमान एकमेव असा व्यक्ती आहे, ज्याला तो पावला त्याच्या आयुष्याचे कल्याणच झाले म्हणून समजा. असो, सलमान आता ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. २३ तारखेला रिलीज होणाºया या चित्रपटात सलमान मंद व्यक्तीची भूमिका करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटात सोहेल खान, चिनी अभिनेत्री झु झु, दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी धूम उडवून दिली असून, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर धमाका करेल यात शंका नाही.