Join us  

सलमान खानने प्रियंका चोप्रावर डागली तोफ, कॅटरिनाचे केले कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 4:46 PM

सलमान खानच्या भारत सिनेमात कॅटरिनाच्या आधी प्रियंका चोप्राला साईन करण्यात आले होते. मात्र लग्नाच्या तारखेमुळे तिने अचानक हा सिनेमा सोडून दिला.

ठळक मुद्दे भारतमध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफ, दिशा पाटनीची मुख्य भूमिका आहे ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सलमान खानच्या भारत सिनेमात कॅटरिनाच्या आधी प्रियंका चोप्राला साईन करण्यात आले होते. मात्र लग्नाच्या तारखेमुळे तिने अचानक हा सिनेमा सोडून दिला. ऐनवेळेवर प्रियंकाच्या जागी कॅटरिना साईन करण्यात आले. हे सगळं इतक्या फटाफट झाले की कॅटला भारतमधील भूमिका समजून घेण्यासाठी कमी वेळ मिळाला.   

सध्या भारतची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर फॅन्सच्या प्रश्नांची उत्तर देताना सलमानने पुन्हा एकदा प्रियंकावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर कॅटरिनाला ही भूमिका साकारण्यासाठी तू काय काय तयारी केलीस असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर द्यायला कॅटने सुरुवात केली असतानाच सलमानने मध्येच बोलायला सुरुवात केली. सलमान म्हणाला, ''सिनेमाची तयारी करायला प्रियंका चोप्राने जास्त वेळ दिला नाही. मात्र कॅटरिनाने ही भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.जर प्रियंकाने थोडा जास्तवेळ दिला असता तर...''     

 शूटींग पाच दिवसांवर आली असताना प्रियंकाने सिनेमासाठी नकार दिला होता. साहजिकचं प्रियंकाच्या या अडेलतट्टू वागण्याने भाईजान कमालीचा संतापला होता. सलमानच्या मनात अजूनही तो राग खदखदतो आहे. 

भारत सिनेमाचे ट्रेलर आणि दोन गाणी रिलीज झाली आहेत. ट्रेलर आणि गाणं दोनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.  भारतमध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत.  ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. 

टॅग्स :सलमान खानप्रियंका चोप्रा