Join us

या महिन्यात सलमान खान सुरू करणार 'रेस ३' च्या शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:09 IST

सध्या सलमान खान ग्रीस मध्ये 'टायगर जिंदा है' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवरून रोज एकतरी फोटो किंवा ...

सध्या सलमान खान ग्रीस मध्ये 'टायगर जिंदा है' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवरून रोज एकतरी फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना दिसतोय. त्यामुळे सलमानच्या फॅन्सची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढत चालली आहे. या चित्रपटाच्या शेवटच्या गाण्याच्या शूटनंतर बहुतेक सलमान त्याच्या कामातून ब्रेक घेणार नाही. कारण मिड डेच्या रिपोर्टनुसार सलमान खान ग्रीस वरून परतताना आबु धाबीमध्ये मेकर रेमो डिसोझाला भेटायला जाणार आहे. रेमो आबुधाबीमध्ये आधीपासूनच गेला आहे तो चित्रपट 'रेस ३' च्या शूटिंगच्या पहिल्या शेड्युलची तिथे तयारी करत आहे.या चित्रपटात सलमान एका इंटरेस्टिंग भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या बरोबर 'रेस ३'मध्ये बॉबी देओल सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटाला घेऊन सगळेच फार उत्सुक आहेत. सगळ्यांना या चित्रपटाचे बिहाईंड द सीन्स पाहण्यात  सुद्धा प्रेक्षकांना फार इंटरेस्ट आहे. कारण या चित्रपटाच्या सेटवर धमाल असणार यात काहीच शंकाच नाही.रेसचे निर्माता रमेश तौरानीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले 'मी मुख्य भूमकेसाठी सलमान आणि जॅकलिन फर्नांडिसची निवड केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार आहे. बाकीची कास्ट आणि क्रू मेंबर अजून फायनल करायचे बाकी आहे. मुबंईमध्ये या चित्रपटाचे पाहिले शूटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.  बाकीचे शूटिंग आम्ही परदेशात करू सध्या आम्ही परदेशात शूट करण्यासाठी तारखा ठरवत आहोत'  पण आता असे वाटते आहे की या चित्रपटाचे पाहिले शूट आबू धाबीमध्ये सुरू होईल. काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या टायगर जिंदा है पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. हा अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे. पाच वर्षांनंतर एकत्र येत असलेल्या सलमान व कॅट या दोघांमधील केमिस्ट्री चित्रपट रिलीज होण्याअगोदरच दिसून येत आहे. सलमानने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, हा चित्रपट त्याच्या ‘एक था टायगर’पेक्षा अधिक जबरदस्त असेल.