मी खूप बोअरिंग आयुष्य जगतो, असे का म्हणतोय सलमान खान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 12:37 IST
सलमान खानचे आयुष्य केवळ एक दिवसासाठी जगता आले तर? याची कल्पना करून अनेकजण हवेत उडायला लागतील. सलमानसारखे आयुष्य (अर्थात ...
मी खूप बोअरिंग आयुष्य जगतो, असे का म्हणतोय सलमान खान?
सलमान खानचे आयुष्य केवळ एक दिवसासाठी जगता आले तर? याची कल्पना करून अनेकजण हवेत उडायला लागतील. सलमानसारखे आयुष्य (अर्थात तुरुंगातील काही दिवस वगळले तर) कुणाला नकोयं. पण खुद्द सलमान याबद्दल काय वाटते? सलमानचे मानाल तर त्याचे आयुष्य प्रंचड बोअरिंग आहे. काल एका इव्हेंटमध्ये सलमानने खुद्द हे सांगितले. बाहेरून माझे आयुष्य जितके सोपे वाटते, तितके सोपे नाहीयं. मी बोअरिंग आयुष्य जगलोय. कठोर मेहनत केलीय. मीडियाने रंगवलेल्या चित्रापेक्षा हे चित्र एकदम विसंगत आहे. मी अजूनही वन रूम अपार्टमेंटमध्ये राहतो. प्रेसमध्ये यावर चर्चा होते, तेव्हा मला बरेच लाजीरवाणे वाटते. माझ्या मते, मी अतिशय बोअरिंग आयुष्य जगलेयं. अर्थात पत्रकार माझे आयुष्य इंटरेस्टिंग बनवतात. माझे आयुष्य एक दिवस जगून बघा. दिवसभर मी इतका व्यस्त असतो की, तुम्हालाही ते बोअरिंग वाटेल. उणापुरा सोळा वर्षांचा असताना मी ‘हम दिल दे चुके सनम’,‘बीवी नंबर1’ सारखे चित्रपट केलेत. त्यावेळी २४-२४ तास काम केले. गेल्या ३० वर्षांपासून मी चुकलोयं, हेच मला सांगितले जात आहे. मला लोक चुकीचे समजतात, हे माझ्या गळी उतरवले जात आहे. पण वर्षांनुवर्षे लोक तुम्हाला चूक कसे समजू शकतात? सगळे जगतात, तसेच मी जगलो. आठवड्यातले सात दिवस २४ तास काम केले. याशिवाय तुम्ही जे काही ऐकता, ती सगळे मीडियाची पुण्याई आहे. कोर्ट केसेसमुळे चिंतेत असतानाही, मीडियासमोर मला हसावे लागते. मुलाखती द्याव्या लागतात, असे सलमान म्हणाला.ALSO READ :‘स्वॅग से स्वागत’ करणा-या सलमान खानची पकडली गेली चोरी! इथे आहे, पुरावा!!आयुष्यात काहीही स्थिर नाही, यावर माझा विश्वास आहे. मी जेव्हा जेव्हा यशामुळे हवेत उडायला लागलो, तेव्हा तेव्हा देवाने मला जमिनीवर आणून आपटले. त्यामुळे आता स्टारडम माझ्या डोक्यात जात नाही. आयुष्यात केवळ १० लाख कमवायचे, एवढेच माझे स्वप्न होते. दुसºया चित्रपटासोबतच माझे हे स्वप्न पूर्ण झाले. यानंतरचे सगळे ‘प्लस’ आहे, असे मी मानतो. माझ्या घरासमोरचा सिक्युरिटी गार्ड, माझी गाडी स्वच्छ करणारे लोक बघितले की, मला देवाने खूप काही दिलेय, असे मला वाटते. एक चांगले कुटुंब, भरभरून प्रेम करणारे चाहते माझ्यासोबत आहेत, असे मला जाणवते, असेही सलमान म्हणाला.