सलमान खान म्हणतो,माझा प्रेमावर अजिबात विश्वास नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2017 12:03 IST
सलमान खान कुठेही असो, त्याला एक प्रश्न हमखास विचारला जातो, तो म्हणजे, लग्नाबद्दलचा. तू लग्न कधी करणार? कदाचित हा ...
सलमान खान म्हणतो,माझा प्रेमावर अजिबात विश्वास नाही!
सलमान खान कुठेही असो, त्याला एक प्रश्न हमखास विचारला जातो, तो म्हणजे, लग्नाबद्दलचा. तू लग्न कधी करणार? कदाचित हा सलमानला सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न असावा. प्रत्येकवेळी सलमानला हा प्रश्न विचारला जातो अन् दरवेळी सलमान तो आपल्यापरीने टोलवून लावतो. पण तरिही हा प्रश्न सलमानचा पिच्छा सोडत नाही. अलीकडे एका मुलाखतीतही सलमानला हाच प्रश्न विचारला गेला. पण यावेळी या प्रश्नावर सलमानने अगदी अनपेक्षित उत्तर दिले. त्याचे ते उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. होय, लग्न हा पैशाचा अपव्यय आहे, असे सलमान म्हणाला.अर्थात सलमानच्या या मताशी अनेकजण सहमत असतील. तर कित्येजण सलमानच्या या मताविरोधात असतील. पण सलमानला याने काहीही फरक पडत नाही. ‘माय लाईफ, माय रूल्स’ या तत्त्वाने जगणाºया सलमानचे हे ठाम मत आहे. केवळ लग्नाबद्दलच नाही तर आताश: प्रेमाबद्दलही त्याचे असेच काहीसे ठाम मत तयार झाले आहे.(कदाचित पूर्वानुभवातून) होय, माझा प्रेमावर जराही विश्वास नाही, असे सलमान ठामपणे सांगतो. माझा प्रेमावर अजिबात विश्वास नाही. प्रेम हा शब्द अस्तित्वात आहे, याचे काहीही कारण मला दिसत नाही. केवळ गरज हा शब्दच सत्य आहे. कुणाची गरज मोठी आहे. काही क्षणाला तुम्हाला तिची गरज जाणवते. पण कदाचित त्या क्षणाला तिला तुमची गरज नसते. एकंदर काय तर त्या क्षणाला गरज समान असायला हवी. पण प्रत्येकाची गरज एकच असणे प्रत्येकवेळी शक्य नाही. माझ्यामते, पे्रम म्हणजे नुसती गरज आहे. यापेक्षा काहीही नाही, असे सलमान यावेळी म्हणाला.ALSO READ : SEE PICS : युलिया वेंटरचा सलमान ‘खानदान’सोबत इफ्तार!सलमानची प्रेमाची ही व्याख्या तुम्हाला किती पटते, किती नाही, आम्हाला ठाऊक नाही. सलमानच्या या व्याख्येबद्दल तुम्हाला काय वाटते, ते आम्हाला लिहायला विसरू नका. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.