Join us  

सलमान खानने नाकारली वेबसीरिज! म्हणे, मला बकवास आवडत नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 11:36 AM

एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमानला त्याच्या डिजिटल डेब्यूबद्दल प्रश्न विचारला गेला. बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स वेब सीरिजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. त्यामुळे तू सुद्धा येत्या दिवसांत डिजिटल डेब्यू करणार का? असा हा प्रश्न होता. पण ...

ठळक मुद्दे तूर्तास सलमान खान ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होतोय. हा चित्रपट हातावेगळा केल्यानंतर लगेच तो ‘दबंग3’चे शूटींग सुरु करणार आहे आणि यापाठोपाठ भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’मध्ये दिसणार आहे.

बॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणारा ‘दबंग खान’ सलमान खान याने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत अनेक नव्या चेह-यांना संधी दिली. लवकरच जहीर इक्बाल आणि प्रनूतन यांना सलमान लॉन्च करतोय. जहीर व प्रनूतनचा ‘नोटबुक’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान भाईजान सलमानने एक खास खुलासा केला. होय, या इव्हेंटमध्ये सलमानला त्याच्या डिजिटल डेब्यूबद्दल प्रश्न विचारला गेला. बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स वेब सीरिजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. त्यामुळे तू सुद्धा येत्या दिवसांत डिजिटल डेब्यू करणार का? असा हा प्रश्न होता. पण या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान स्वत:च्या डिजिटल डेब्यूबद्दल कमी अन् डिजिटल कंटेन्टवर अधिक बोलला.

होय, बेव सीरिज हे माध्यम चांगले आहे. पण माझे मत विचाराल तर वेब सीरिजच्या नावाखाली चाललेल्या बकवास गोष्टी मला अजिबात पसंत नाहीत. मला अलीकडे एका वेब सीरिजची आॅफर दिली गेली. पण मी त्यास नकार दिला. पुढेमागे मी सुद्धा वेबसाठी कंटेन्ट प्रोड्यूस करेल. पण ‘हम आपके है कौन’ टाईप. मी पूर्णपणे कौटुंबिक वेबसीरिज बनवणार, असे सलमान म्हणाला.

‘नोटबुक’ हा चित्रपट ‘द टीचर्स डायरी’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे का? असे विचारले असता,  ‘द टीचर्स डायरी’ काय आहे? आमचा चित्रपट त्यापेक्षाही चांगला आहे, असे सलमान म्हणाला.तूर्तास सलमान खान ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होतोय. हा चित्रपट हातावेगळा केल्यानंतर लगेच तो ‘दबंग3’चे शूटींग सुरु करणार आहे आणि यापाठोपाठ भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :सलमान खान