Join us

सलमान खानची पहिली सॅलरी होती केवळ 75 रुपये, 'मैंने प्यार किया' आधी केलं होतं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 08:00 IST

सलमान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. एका सिनेमासाठी तो कोट्यावधी रुपये घेतो

सलमान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. एका सिनेमासाठी तो कोट्यावधी रुपये घेतो. 'बिग बॉस' ची फी वाढ देखील यावेळी चर्चेत आली होती. 'बिग बॉस 13' दरम्यान त्याने प्रत्येक एपिसोडसाठी 6.5 कोटी रुपये घेतल्याचीही बातमी समोर आली आहे. त्याचे मानधन सतत वाढत आहे. पण  तुम्हाला माहिती आहे का सलमान खानला त्याचा पहिला पगार किती मिळाला होता?

सलमान खानने केला होता ताज हॉटेलमध्ये डान्स सलमान खान बी-टाऊनमधील सगळ्यात महागडा अभिनेता आहे. पण त्याने 1988मध्ये अभिनय करण्यास सुरवात करण्यापूर्वी त्याला केवळ 75 रुपयांचा चेक मिळाला होतो. पीटीआयला दिलेल्या एका जुना मुलाखती दरम्यान  सलमान खानने आपल्या पहिल्या पगाराबद्दल सांगितले होते. तो म्हणाले होते, मला वाटतं, माझा पहिला पगार जवळपास 75 रुपये होता. मी ताज हॉटेल शोमध्ये डान्स केला होता. माझा एक मित्र तिथे डान्स करत होता मजा म्हणून तो मला पण घेऊन गेला. 

सलमानने सांगितले होते की यानंतर सॉफ्ट ड्रिंक ब्रँडसाठी त्याला 750 रुपये मिळाले, त्यानंतर दीर्घकाळासाठी त्याला 1500 रुपये मिळत राहिले. 'मैंने प्यार किया' साठी 31000 हजार मिळाले होते जे नंतर वाढवून 75000 हजार केले. 2018 मध्ये जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सलमानने आपलं स्थान मिळावले होते.  

टॅग्स :सलमान खान