Join us  

सुशांत आत्महत्या प्रकरणात सलमान खानची सुटका, होणार नाही चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 6:12 PM

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत 35 जणांची चौकशी करण्यात आली आहे.

सुशांत सिंग राजपूत मृत्यूच्या प्रकरणात पोलीस सातत्याने तपास करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 35 लोकांची चौकशी करण्यात आली आहे. सलमान खानला देखील चौकशीसाठी पोलीस बोलवणार अशी चर्चा सकाळपासून होती. मात्र ही चर्चा केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे.

रिपोर्टनुसार पोलीस सलमान खानला या प्रकरणातील चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलेले नाही. अनेकांनी सुशांतची आत्महत्या कटाचा भाग असल्याचा आरोप करत, याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही लावून धरली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलिस वेगवेगळ्या मार्गाने तपास करत आहेत.

अलीकडे पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमानची एक्स- मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची चौकशी केली होती. आता पोलिस सलमान खान याचीही चौकशी करण्याची शक्यता आहे अशी चर्चा होती मात्र डीसीपीने या सगळ्या चर्चांना विराम लावला आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आत्तापर्यंत त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती, त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराची अभिनेत्री संजना सांघी, यशराज फिल्म्स अशा एकूण तीन डझनभर लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसलमान खान