बॅकग्राउंड डान्सर असलेल्या डेजी शहासाठी सलमान खानने उघडले बॉलिवूडचे दरवाजे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 14:27 IST
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने कित्येक न्यूकमर्सला बॉलिवूडमध्ये एंट्री दिली. त्यामुळेच सलमानला बी-टाउनचा गॉडफादर असे म्हटले जाते. सलमानने ज्या ...
बॅकग्राउंड डान्सर असलेल्या डेजी शहासाठी सलमान खानने उघडले बॉलिवूडचे दरवाजे!
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने कित्येक न्यूकमर्सला बॉलिवूडमध्ये एंट्री दिली. त्यामुळेच सलमानला बी-टाउनचा गॉडफादर असे म्हटले जाते. सलमानने ज्या न्यूकमर्सला बॉलिवूडमध्ये एंट्री दिली, त्यामध्ये अभिनेत्री डेजी शाह हिचेही नाव आहे. डेजीने सलमान स्टारर ‘जय हो’मधून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात ती सलमानच्या अपोझिट दिसली. वास्तविक डेजीने २०११ मध्येच कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. त्याचबरोबर २००३ मध्ये आलेल्या सलमानच्या एका सुपरहिट चित्रपटातही डेजी शाह झळकली होती. असो, डेजी पुन्हा एकदा सलमानसोबत आगामी ‘रेस-३’मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. साइड डान्सर म्हणून काम करणारी डेजी आता मुख्य अभिनेत्री म्हणून झळकत आहे. डेजीने ‘जय हो’नंतर ‘हेट स्टोरी-३’मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. या चित्रपटात तिने जबरदस्त बोल्ड सीन दिले आहेत. डेजीच्या करिअरविषयी सांगायचे झाल्यास, तिने ‘जय हो’ अगोदर सलमान खानसोबत एका चित्रपटात काम केले आहे. ही बाब फारच कमी लोकांना माहिती आहे. वास्तविक डेजी अभिनेत्री बनण्याअगोदर बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करीत होती. तिला सुरुवातीपासूनच डान्सची आवड आहे. एक दिवस बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे डेजीकडे लक्ष गेले. पुढे त्यांनी तिला त्यांच्या डान्सिग ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. पुढे डेजीने तब्बल दोन वर्षे गणेश आचार्य यांच्या ग्रुपमध्ये डान्सर म्हणून काम केले. पुढे त्यांची डान्स असिस्टंट म्हणूनही तिने काम केले. या व्यतिरिक्त ती मॉडलिंगमध्ये करिअर करीत होती. याचदरम्यान तिला २००३ मध्ये आलेल्या सलमान खानच्या एका सुपरहिट चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. होय, २००३ मध्ये आलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात डेजीने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. परंतु तिला कोणीही त्यावेळी नोटीस केले नव्हते.