सलमान खानने आतपर्यंत अनेक नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. सोनाक्षी सिन्हा, प्रनूतन ते अगदी सई मांजरेकर सलमानने अनेक चेहरे बॉलिवूडला दिले आहेत. या लिस्टमध्ये आता आणखी एक नवा सामील होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेल कैफ चर्चेत आहेत. इसाबेला सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. लवकरच ती बॉलिवूड डेब्यूची करणार असल्याची चर्चा आहे.
इसाबेलने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सोशल मीडियावर क्वथा सिनेमाच्या मुहूर्ताचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन सुद्धा लिहिले होते. यात तिच्यासोबत सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत क्वथा सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमाचे दिग्दर्शन करण भुतानी करणार आहे. सलमानचे इसाबेलला बॉलिवूडमध्ये लाँच करतोय अशी माहिती आहे.
हा सिनेमा आर्मीतील सत्य घटनेवर आधारित आहे. आयुष शर्मा यात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिकेसाठी तो मेहनत करतोय.
इसाबेलची बहीण कतरिना कैफ बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. लवकरच कॅट बिग बजेट सिनेमा सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे, ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, नीना गुप्ता, गुलशन ग्रोव्हर, सिकंदर खेर, जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.