Join us  

सलमान खानने अनेकांचं केलं वाटोळं, सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करून बड्या लोकांचा पर्दाफाश करा, 'दबंग'च्या दिग्दर्शकाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 2:30 PM

कंगाना रणौतनं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं आहे. कंगणा पाठोपाठ बॉलिवूड दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी याच मुद्द्यावरवरून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

सिनेइंडस्ट्रीत आपल्यावर कोणाचाही वरदहस्त नसल्याचं जाणत असणाऱ्या सुशांतला या झगमगणाऱ्या दुनियेतून आपल्याला दूर फेकूनही दिलं जाऊ शकतं अशी धास्ती एकेकाळी सतावत होती. त्याचं ट्विट पाहता हे लक्षात येतं. निधनानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या नेपोटीझम हा मुद्दा चर्चेत आला आहे. नुकतेच कंगणा राणौतने देखील पुन्हा एकदा नेपोटिझ मुद्दा समोर आणला आहे. मुळात ती नेहमीच याबाबत बोलत आली आहे.अनेकदा यावरून वादही झाले आहे. 'छिछोरे' नंतर सुशांतकडे 7 सिनेमा होते मात्र ते सिनेमा एक-एक करून त्याच्या हातून निसटले. त्यामुळे तो सुद्धा नेपोटिझमचा शिकार झाल्याचं बोललं जात आहे. कंगाना रणौतनं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं आहे. कंगणा पाठोपाठ बॉलिवूड दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी याच मुद्द्यावरवरून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.पोस्ट शेअर करत म्हटले की, यशराज सारख्या एजन्सींनीच्या मनमानीमुळेच कदाचित सुशांतसारखे कलाकारांना इतके टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडतात. या एजन्सी कलाकारांचं करिअर बनवण्याच्या नावाखाली स्वतःचा फायदा करून घेतात. कलाकरांचे करिअर बनवणे तर दुरच बिघडवण्याचं काम जास्त करतात. मी देखील अशा एजन्सीच्या मनमानीचा बळी ठरलो आहे.  या एजन्सी कलाकारांना साइन केल्यानंतर आपली ती मनमानी करतात. 

आपल्यालाही अनेकवेळा नेपोटीझमचा फटका सहन करावा लागल्याचे अभिनव यांनी सांगत थेट सलमान खानवर निशाणा साधला आहे.' अभिनव यांनी त्याच्या पोस्टमध्ये त्यांचा स्वतःचा अनुभव शेअर केला होता. त्यांनी लिहिल, दबंग मेकिंगच्या वेळी माझ्यासोबतही हे सर्व घडलं आहे. त्यावेळी अरबाज खान, सोहेल खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी फक्त मला घाबरवलं, धमकावलं नाही तर त्यांनी माझं करिअर कंट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. अरबाज माझा दबंग नंतर दुसऱ्या सिनेमाचा प्रोजेक्ट सुद्धा आपल्या फॅमिली पावरचा वापर करून माझ्याकडून काढून घेतला होता. ज्यामुळे माझं खूप नुकसान झालं होतं. दबंगच्या रिलीजच्या वेळी माझी नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली आणि माझी नकारात्मक पब्लिसिटी केली गेली.

अभिनव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, माझ्या पर्सनल लाइफमध्ये अनेक चढ-उतार आले पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. मला वेगवेगळ्या नंबरवरून धमकी देण्यात आली. मी त्यावेळी पोलीसांत तक्रार सुद्धा केली होती. अभिनवनं त्याच्या पोस्टमध्ये जे लोक आपली मनमानी करून कलाकारांनी असं वर्तन करतात. त्यांचा पर्दाफाश करणं गरजेच आहे आणि यात सर्वात मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे सलमान खान असं म्हणत सलमानवर थेट आरोप केले आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसलमान खानअरबाज खानकंगना राणौत