Join us  

Salman Khan : सलमानने २ कोटींच्या नव्या बुलेटप्रूफ कारला बांधली लिंबू मिरचीची माळ, चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 2:23 PM

Salman Khan : सतत मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानने नुकतीच नवी बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. या गाडीची खासियत म्हणजे ही बुलेटप्रूफ गाडी अजूनही भारतीय बाजारपेठेत लाँच झालेली नाही.

बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात लोकप्रिय अभिनेता सलमान खान याने त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या कारची भर पडल्याचं तुम्हाला ठाऊक आहेच. होय, सतत मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानने नुकतीच नवी बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. या गाडीची खासियत म्हणजे ही बुलेटप्रूफ गाडी अजूनही भारतीय बाजारपेठेत लाँच झालेली नाही. मात्र, या आधीच सलमान खान याने ही २ कोटींवी कार खरेदी केली. पण यानंतर काय तर सलमानने तेच केलं, ते प्रत्येक भारतीय करतो. होय, कारच्या समोर लिंबू मिरचीची दृष्टमाळ लटकवली.

'किसी का भाई किसी की जान'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये सलमान आपल्या बुलेट प्रूफ कारमधून आला होता. कार्यक्रमस्थळी उभ्या असलेल्या या कारचे लगेच फोटो व्हायरल झालेत. कारवरच्या २७२७ या नंबर प्लेटने लोकांचं लक्ष वेधलं शिवाय नंबरप्लेटच्या बाजूला लटकवलेल्या लिंबू मिरचीच्या माळेनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मग काय, सोशल मीडियावर लगेच त्याची चर्चा सुरू झाली. अखेर नजरबट्टूही काम आया, असं म्हणत अनेकांनी यावर आपआपल्या कमेंट्स दिल्यात.

सलमानच्या नव्या कारचा नंबर २७२७ आहे. २७ हीच सलमानची जन्मतारीख आहे. २७ डिसेंबर १९६५ रोजी सलमानचा जन्म झाला होता. २७ हा नंबर लकी असल्याचं सलमान मानतो. त्याच्या कारचा नंबरही त्याने तोच ठेवला. काही दिवसांपूर्वी सलमान खानला धमकीचे ई-मेल आले होते. या प्रकरणात गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले होते. तेव्हापासून सलमान पांढऱ्या रंगाची बुलेटप्रूफ लँड क्रूझर एसयूव्हीमधून प्रवास करत आहे. सलमान खानने निसान पेट्रोल एसयूव्ही विदेशातून आयात केली आहे.

सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झाल्यास हा सिनेमा येत्या २१ एप्रिलला रिलीज होतोय. या सिनेमात त्याच्यासोबत पूजा हेगडे, व्यंकटेश दुग्गुबाती, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, जस्सी गिल असे अनेक स्टार्स आहेत.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड