Join us  

 सलमान खान बनला या ‘बिग बॉस’ फेम ब्युटी क्वीनचा गॉडफादर! अशी करतोय मदत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 10:14 AM

भाईजानने अनेकांना संधी दिली. अनेकांचे करिअर मार्गी लावले. या यादीत ब-याच जणांचे नाव सामील आहे. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमिस इंडिया, मिस दिवा या ब्युटी कॉन्स्टेमध्येही तिने सहभाग घेतला. 2016 साली झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेन्टंस या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

सलमान खान बॉलिवूडमधील अनेकांचा गॉडफादर आहे. भाईजानने अनेकांना संधी दिली. अनेकांचे करिअर मार्गी लावले. या यादीत ब-याच जणांचे नाव सामील आहे. आता या यादीत आणखी एक नाव  समाविष्ट झाले आहे. ते म्हणजे मॉडेल व ब्युटी क्वीन लोपामुद्रा राऊत हिचे. होय, बिग बॉस 10 मध्ये दिसलेली लोपामुद्रा हिच्या करिअरचा जिम्मा आता सलमानने आपल्या खांद्यावर घेतला आहे. केवळ इतकेच नाही तर लोपामुद्राला आपल्या फ्रेंडसर्कलमध्ये फिट करण्याचेही त्याचे प्रयत्न आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत 3-4 महिन्यांपासून सलमान खान लोपामुद्राला मार्गदर्शन करतोय. दोघांची मैत्रीही वाढते आहे. सलमानच्या कुटुंबाला लोपामुद्रा जाम आवडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अनेकदा सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये ती दिसली.

सलमानच्या फॅमिली फंक्शनमध्येही ती दिसू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतही लोपामुद्रा हजर होती. त्यापूर्वी सलमानच्या फार्महाऊसवरही लोपामुद्रा दिसली होती. याचे कारणही खास होते.  सलमानने आपल्या पर्सनल फोटोग्राफला सांगून त्याच्या फार्महाऊसवर लोपाचे फोटोशूट केले होते.

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर लोपामुद्राचे करिअर फार गती घेऊ शकले नाही. त्यामुळे सलमानने तिला मदतीचा हात देऊ केला. लोपाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक देण्याचेही भाईजानचे प्रयत्न आहेत. बिग बॉसच्या घरात लोपा एक स्ट्राँग कंटेस्टंट होती. अर्थात ती शो जिंकू शकली नाही. पण स्वत:च्या स्मार्ट गेमने तिने प्रेक्षकांना चांगलेच प्रभावित केले होते.

मिस इंडिया, मिस दिवा या ब्युटी कॉन्स्टेमध्येही तिने सहभाग घेतला. 2016 साली झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेन्टंस या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेत ती सेकंड रनर-अप राहिली होती. मॉडेलिंगच्या दुनियेतून आल्यामुळे हॉट आणि सेक्सी अंदाज लोपामुद्रासाठी काही नवा नाही. सोशल मीडियावर लोपामुद्रा स्वत:चे हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो शेअर करत असते.

टॅग्स :सलमान खानबिग बॉस