Join us

​फ्रेडी दारूवालाला सलमान खानने दिले ‘मेट्रोसेक्शुअल’ नाव; पण का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 10:20 IST

अक्षय कुमार स्टारर ‘हॉलिडे : अ सोल्जर इस नेवर आॅफ ड्युटी’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत बॉलिवूड डेब्यू करणारा  फ्रेडी दारूवाला याने ...

अक्षय कुमार स्टारर ‘हॉलिडे : अ सोल्जर इस नेवर आॅफ ड्युटी’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत बॉलिवूड डेब्यू करणारा  फ्रेडी दारूवाला याने आज स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.  सध्या फ्रेडीने आपले संपूर्ण लक्ष बॉलिवूडवर केंद्रीत केले आहे. फ्रेडीने एका पंजाबी सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘मम्मी’ या पंजाबी चित्रपटात तो सर्वप्रथम दिसला. यानंतर त्याच्या वाट्याला ‘हॉलिडे : अ सोल्जर इस नेवर आॅफ ड्युटी’ हा बॉलिवूडपट आला. यात फ्रेडीने खलनायक साकारला. या पहिल्यावहिल्या बॉलिवूडपटातील फ्रेडीचा अभिनय सगळ्यांना अवाक करणारा होता. आज रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर  ‘रेस3’मध्ये फ्रेडी पुन्हा एकदा निगेटीव्ह रोलमध्ये आहे. या चित्रपटात काम करत असताना  फ्रेडीला ‘मेट्रोसेक्शुअल’ हे नाव मिळाले. अर्थात गमतीने. खरे म्हणजे, सलमाननेचं हे नाव  फ्रेडीला दिले.‘रेस3’च्या सेटवर सगळेच  फ्रेडीला ‘मेट्रोसेक्शुअल’याच नावाने चिडवत. इतकेच काय तर अलीकडे ‘रेस3’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्येही सलमानने ‘हाय मेट्रोसेक्युअल’ असे म्हणून  फ्रेडीची ओळख करून दिली होती. आता  फ्रेडीला हे नाव कसे मिळाले ते तर जाणून घ्यायलाचं हवे.अलीकडे  फ्रेडीने स्वत:चं याचा खुलासा केला. त्याने यामागची अख्खी स्टोरीचं सांगितली. त्याने सांगितले की, आता सलमान मला पाहिले की, ‘मेट्रोसेक्शुअल’ म्हणूनच हाक मारतो. अर्थात गमतीने. त्याचे झाले असे की, मी मॉडेलिंगच्या दुनियेतून येथे आलो आहे. उन्हापासून स्वत:ची स्किन वाचवायची, असे मॉडेलिंगच्या त्या काळात मला सांगण्यात आले होते. तो संस्कार मी आजही कसोशीने पाळतो. ‘रेस3’च्या सेटवरही असेच झाले. मी माझ्या व्हॅनबाहेर छत्रीशिवाय पायचं ठेवायचो नाही. उन्हात माझी स्कीन टॅन होणार नाही, याची मी काळजी घ्यायचो. याऊलट सलमान सर एकदा सेटवर आले की, तिथलेच बनून जायचे. मग ऊन असो वा काहीही़ त्यांना एक फॅन पुरेसा असायचा. माझे ते वागणे बघून सलमान सर खूप हसायचे. मग काय त्यांनी मला ‘मेट्रोसेक्शुअल’ हे नावचं ठेवले.  मी ही ते तितकेच खिलाडूवृत्तीने घेतले. शेवटी ‘हम मर्दो को भी खूबसुरत दिखने का हक है यार....’ALSO READ:  ​फ्रेडी दारूवालाला आहे ‘हा’ महागडा शौक!