Join us  

OMG ! ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी!!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 4:03 PM

सलमान खान व कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याचदरम्यान आज ‘भारत’चे ‘जिंदा’ हे गाणे लॉन्च करण्यात आले. अर्थात चित्रपटातील या गाण्यापेक्षा या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटची अधिक चर्चा झाली.

ठळक मुद्देकधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले.

सलमान खान व कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याचदरम्यान आज ‘भारत’चे ‘जिंदा’ हे गाणे लॉन्च करण्यात आले. अर्थात चित्रपटातील या गाण्यापेक्षा या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटची अधिक चर्चा झाली.होय, काही क्षणांपूर्वी सलमान, कतरीना यांच्या उपस्थितीत या गाण्याचा ग्रॅण्ड लॉन्च इव्हेंट पार पडला. पण यादरम्यान जे काही झाले ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. होय, या इव्हेंटदरम्यान भाईजान चक्क कतरीनाची साडी ठीक करताना दिसला. या इव्हेंटमध्ये सलमान काळा शर्ट आणि निळ्या रंगाचा डेनिम जीन्स घालून पोहोचला. तर कतरीना काळ्या किनारीच्या शिफॉनच्या साडीत दिसली. सलमान व कॅट दोघांनीही एकत्र एन्ट्री घेतली. पण याचदरम्यान कतरीनाची साडी विस्कटली. यानंतर सलमानने काय करावे, तर त्याने चक्क गुडघ्यात वाकून कतरीनाची विस्कटलेली साडी नीट केली.

चुरगळलेल्या निºयाना चापून चोपून नीट बसवले. साहजिकच, हे पाहून सगळेच अवाक् झालेत. मीडियाच्या कॅमेºयांनी हा क्षण आपल्या कॅमेºयात कैद केला. सलमान असा मदतीला धावलेला पाहून कतरीनाची कळी खुलली. तिच्या चेह-यावर वेगळेच स्मित फुलले.

सलमान व कटरिनाची रिअल लाईफ केमिस्ट्रीपेक्षा रिल लाईफ केमिस्ट्री दमदार आहे. एकदा सलमानसोबतच्या नात्याबद्दल बोलताना खुद्द कतरीनाने आमच्यात एक खास नाते आहे. पण या नात्याला नाव देता येणार नाही, असे म्हटले होते.

कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले. पुढे अगदी चित्रपटांत शोभावे तसे कॅट व रणबीरचेही ब्रेकअप झाले आणि कॅट पुन्हा भाईजानच्या जवळ आली. कदाचित म्हणूनच प्रसंग कुठलाही असो, भाईजान कॅटच्या मदतीला तत्पर असतो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफभारत सिनेमा