Join us

सलमान खानने त्याच्या चाहत्यांना ‘या’ कारणामुळे केले सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 21:29 IST

बॉलिवूडचा दबंग सलमान खान नेहमीच त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे पसंत करतो. त्याचबरोबर त्यांची वेळोवेळी काळजीही घेताना दिसतो. याचा प्रत्यय ...

बॉलिवूडचा दबंग सलमान खान नेहमीच त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे पसंत करतो. त्याचबरोबर त्यांची वेळोवेळी काळजीही घेताना दिसतो. याचा प्रत्यय नुकताच आला असून, त्याच्या चाहत्यांना सतर्क करण्यासाठी त्याने एक चेतावणी दिली आहे. त्याचे झाले असे की, सलमान ‘बीइंग ह्यूमन’ नावाची संस्था चालवितो. मात्र या संस्थेच्या नावावे सोशल मीडियावर बरेचसे अकाउंट आणि काही वेबसाइडही आहेत. ज्यामुळे सलमानच्या चाहत्यांचा गोंधळ होऊ शकतो. तसेच त्यांची फसवणूकही होण्याची दाट शक्यता आहे. अशात चाहत्यांना सतर्क करण्यासाठी सलमानने एक आवाहन केले आहे. सलमानने त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून चाहत्यांना सतर्क करण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये लिहिले की, आम्ही तुम्हाला सतर्क करतो. कारण बरेचशा बनावट वेबसाइटवर असा दावा केला जात आहे की, आम्ही सलमान खान आणि त्याच्या बीइंग ह्यूमन या संस्थेबरोबर काम करीत आहोत. मात्र यांचा सलमान किंवा त्याच्या संस्थेशी काहीही संबंध नसून, केवळ लोकांची फसवणूक करण्यासाठीच या संस्था कार्यरत आहेत. यावेळी सलमानने यामध्ये काही नावेही जाहीर केली आहेत. अमित आहुजा, समीर आणि रवि मल्होत्रा हे नावे या लिस्टमध्ये आहेत. सलमानने पुढे मॅसेजमध्ये लिहिले की, आम्ही कुठल्याही प्रकारचे पर्सनल लोन किंवा एज्युकेशन लोन देत नाही. त्यामुळे कृपया, बीइंग ह्यूमन नावाने संस्था चालवित असलेल्या तोतया व्यक्तीला किंवा वेबसाइटला कुठल्याही प्रकारचे पैसे देऊ नका. जर तुम्हाला बीइंग ह्यूमन संस्थेची माहिती हवी आहे, तर तुम्ही आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. मात्र कोणत्याही व्यक्तीला कुठल्याच कामाविषयी पैसे देऊ नका, असेही त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. दरम्यान, सलमानचा ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट रिलीज झाला असून, बॉक्स आॅफिसवर करिष्मा दाखविण्यात तो सपशेल अपयशी ठरला आहे. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार आहे.