Join us  

सई मांजरेकरला सलमान खान म्हणतो 'जीव', वाचा यामागचं इंटरेस्टिंग कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 6:00 AM

सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'दबंग ३'मधून अभिनेत्री सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट दबंग ३मधून अभिनेत्री सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. सई निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे. या निमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत...

तू बॉलिवूडमधून पदार्पण करते आहेस आणि त्यात मुख्य भूमिकेत सलमान खान आहे, याबद्दल काय सांगशील?मला खूप छान वाटतंय की मला पहिल्याच चित्रपटात सलमान खान यांच्यासोबत काम करायला मिळत आहे. त्यात सुपरहिट ठरलेल्या दबंग चित्रपटाच्या तिसऱ्या फ्रेंचायझीसोबत. देवाची कृपा माझ्यावर अशीच रहावी. 

तुला जेव्हा दबंग ३मध्ये निवड झाल्याचे समजल्यावर तुझी रिअॅक्शन काय होती?जेव्हा मला दबंग ३मध्ये मुख्य भूमिकेसाठी निवड झाल्याचे सांगायला फोन आला होता. फोन ठेवल्यानंतर मी माझ्या खोलीत जाऊन हु़ड हुड दबंग गाणं लावून नाचायला लागले. माझा भाऊ सत्या रूममध्ये आला आणि त्याने विचारलं की काय झालं? मी म्हटलं की मला सिनेमात काम मिळालं. खरंच यासाठी मी सलमान खान यांचे आभार मानते.

सलमान खानकडून तुला काय शिकायला मिळालं व त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता?मला सलमान खान यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. इतका दांडगा अनुभव असतानाही ते आताही चित्रपटासाठी जीतोड मेहनत घेतात व प्रामाणिकपणे काम करतात, ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. सलमान सरांसोबत मी कम्फर्टेबल होते. त्यामुळे शूटिंग कधी संपले कळलेदेखील नाही. 

तुला सेटवर सलमान खान कोणत्या नावाने हाक मारायचे?मला सलमान खान सई अशीच हाक मारत होते. फक्त आई सेटवर असताना ते मला जीव म्हणून हाक मारायचे. कारण मला घरी जीव अशी हाक मारतात. 

दबंग ३मधील तुझ्या लूकबद्दल सांग?दबंगची पार्श्वभूमी माहित असल्यामुळे मला या चित्रपटातील लूकबद्दल अंदाज आला होता. मला साडी व इंडियन लूक करावा लागणार आहे आणि मी खूप उत्सुक होते. 

मराठी चित्रपटात काम करण्याबाबत काही विचार केला आहेस का?स्क्रीप्ट चांगली असेल तर मला मराठीत काम करायला आवडेल. लहानपणापासून मी मराठी चित्रपट पाहत मोठी झाले आहे. त्यामुळे मराठीत काम करायला आवडेल. 

टॅग्स :सई मांजरेकरसलमान खानदबंग 3