सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरचं बॉलिवूड डेब्यू करतोय. ‘लवरात्रि’ या चित्रपटातून तो डेब्यू करतोय. साहजिकचं, या चित्रपटाचे आयुषने जोरदार प्रमोशन चालवले आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटसाठी आयुष व त्याची या चित्रपटाची हिरोईन वरीना हुसैन हे दोघेही गुजरातेत बडोद्याला पोहोचले. पण बडोद्यातील प्रमोशन आयुष व वरीनाला चांगलेच महाग पडले. होय, दिवसभर आयुष व वरीनाने बडोद्याच्या रस्त्यावर या चित्रपटाचे प्रमोशन केले आणि रात्री पोलिस त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचले.
गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवरात्रि’ एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. वरीना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही बऱ्याच अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा आहे. अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत.