Join us

करण जोहरच्या चित्रपटात दिसणार सलमान खान आणि कॅटरिना कैफ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 15:54 IST

सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ करण जोहरच्या चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. सध्या सलमान आणि कॅटरिना टायगर ...

सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ करण जोहरच्या चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. सध्या सलमान आणि कॅटरिना टायगर जिंदा है या चित्रपटात अनेक महिन्यांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतायेत. याचित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कॅटरिना आणि सलमान खान सध्या आबूधाबीला गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे लवकरच करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत.करण जोहरच्या रणबीर कपूरला घेऊन एक चित्रपट तयार करतो आहे. ज्याचे दिग्दर्शन तो स्वत: करणार आहे. करण आपल्या होम प्रॉडक्शनमध्ये तायर होणाऱ्या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि सलमान खानला घेऊ इच्छितो. याचित्रपटात आधी पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला घेण्यात येणार होते.मात्र त्यानंतर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशन तर्फे पाकिस्तानी कलाकारांवर बंदी टाकल्यानंतर करणने त्याजागी सलमान खानला घेण्याची इच्छा व्यक्त केली.  सलमान खानच्या म्हणण्यानुसार स्क्रिप्टमध्ये काही चेंजेस केले जात आहेत. याचित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु झाले आहे. याचित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करणार आहे. आदित्य धर याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे.  याचित्रपटाचे शूटिंग गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार होते.  मात्र भारत -पाकिस्तान यांच्यातील संबंध बिडल्याने याचित्रपटाचे शूटिंग सुरु होऊ शकले नाही. सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर सलमान खान एक मोठ्या ब्रेकनंतर रोमाँटिक चित्रपटात दिसेल. कॅटरिना कैफ सोबत झालेल्या ब्रेकअपनंतर टायगर जिंदा हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. यानंतर करण जोहरच्या चित्रपटात पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पडद्यावर रोमांस करताना दिसेल. त्यामुळे त्यांचे फॅन्स नक्कीच याचित्रपटाचे चित्रिकरण कधी सुरु होईल याची वाट पाहात असतील.