Join us  

लग्न न करताच सलमान खानला हवी आहे ही गोष्ट, पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 5:23 PM

आयत ही मला अर्पिताने दिलेले वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट आहे, असे सालमान म्हणाला होता. अर्पिताच्या प्रसूतीवेळी संपूर्ण खान कुटुंब रुग्णालयात उपस्थित होते.

बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान. पुन्हा एकदा लग्नाचा विचार नसल्याचे सलमानने जाहीर केले आणि त्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सलमानवर जीव ओवाळून टाकणा-या तरुणींचे हार्टब्रेक करणारी गोष्ट घडली आहे. कारण सलमानने एक वक्तव्य केले आहे. वाचून अनेक तरुणींचे हार्टब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. सलमान खाननं नुकताच 54 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्याच दिवशी बहिण अर्पिताने गोंडस मुलीला जन्म दिला. बहिणीकडून मिळालेल्या गिफ्टमुळे सलमान खान खूप खूश आहे. यावरच त्याला प्रश्न अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी त्याने काका-मामा झाल्यानंतर आता बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सलमानचा हा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. यावरून सलमान बॅचलरचा राहणार हे तर स्पष्ट झालेच शिवाय आता त्याला लग्न न करताच बाबा व्हायचंय म्हटल्यावर  अनेक तरूणींचे हार्टब्रेक झाला असणार हे मात्र नक्की.

अर्पिताने आपल्या मुलीचे नाव आयत ठेवले आहे. आयतचा पहिला फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. यात मामू सलमान खान आयतच्या गोड पापा घेताना दिसतोय. आयतच्या जन्मानंतर सलमान तिचा व अर्पिताला भेटायला रूग्णालयात पोहोचला होता.  आयत ही मला अर्पिताने दिलेले वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट आहे, असे सालमान म्हणाला होता. अर्पिताच्या प्रसूतीवेळी संपूर्ण खान कुटुंब रुग्णालयात उपस्थित होते.  

अर्पिता खान शर्माचे हे दुसरे अपत्य आहे. 18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शमार्सोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे. मुळात सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अहिलवर करतो.

टॅग्स :सलमान खानअर्पिता खान