Join us

सलमान खानने पुन्हा शेअर केला कॅटरिना कैफसोबतचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 21:37 IST

जेव्हा-केव्हा सलमान खान आणि कॅटरिना कैफ एकत्र येतात, तेव्हा प्रत्येकाच्या तोंडी यांचीच चर्चा असते. सध्या हे दोघेही त्यांच्या आगामी ...

जेव्हा-केव्हा सलमान खान आणि कॅटरिना कैफ एकत्र येतात, तेव्हा प्रत्येकाच्या तोंडी यांचीच चर्चा असते. सध्या हे दोघेही त्यांच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, फॅन्ससाठी सेटवरील काही रोमॅण्टिक फोटोही ते शेअर करीत आहेत. आता असाच एक फोटो पुन्हा एकदा शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. या अगोदरदेखील सलमानने या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. असो, या फोटोमध्ये सलमान हसू रोखण्याचा खूप प्रयत्न करीत असताना दिसत आहे. तर कॅटरिना खूपच क्युट दिसत असून, विजयी निशाण दाखविताना दिसत आहे. हा फोटो चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. एकेकाळच्या रिलेशनशिपमध्ये असलेले हे दोघे आता विभक्त झाले आहेत; मात्र त्यांच्यातील मैत्री आजही कायम आहे. या दोघांच्याही फॅन्सची इच्छा आहे की, हे दोघे रील लाइफमध्ये नव्हे तर रिअल लाइफमध्येही एकत्र यावेत. दरम्यान, सध्या या चित्रपटाच्या शूटिंगचा बहुतांश भाग संपला असून, चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या अगोदर ‘एक था टायगर’मध्ये हे दोघे झळकले होते. दोघांमधील केमिस्ट्री त्यांच्या फॅन्सना खूपच आवडली होती. ‘एक था टायगर’ या चित्रपटाची कथा भारतीय गुप्तहेर एजेंसी रॉच्या अधिकाºयांभोवती फिरते. या अगोदर सलमानने अली अब्बास यांच्या ‘सुलतान’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड केले होते. आता सलमानला या चित्रपटातून प्रचंड अपेक्षा असून, इतर चित्रपटांप्रमाणेच हाही चित्रपट कमाईचे अनेक रेकॉर्ड करेल, अशी सध्या चर्चा रंगत आहे.