आयुष शर्मासोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार सारा अली खानने
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 13:16 IST
बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी लाखो-करोडो लोक वाट पाहात असतात. प्रत्येकजण एका चांगल्या ऑफरच्या शोधात असतो. सैफ अली खानची मुलगी सारा ...
आयुष शर्मासोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार सारा अली खानने
बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी लाखो-करोडो लोक वाट पाहात असतात. प्रत्येकजण एका चांगल्या ऑफरच्या शोधात असतो. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा ही अशाच एका चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र सारा अनेक चित्रपटाच्या ऑफर रिजेक्ट करताना दिसते आहे. आधी साराने करण जोहरच्या स्टुडेंट ऑफ द इअर चित्रपटातून डेब्यू करण्यास नकार दिला त्यानंतर तिने सलमान खानच्या चित्रपटात काम करण्यास ही नकार दिला. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की सलमान खानच्या लाडक्या बहिणीचा नवरा आयुष शर्माला सलमान खान बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. तसेच त्याच्या अपोझिटला साराचे नाव फायनल करण्यात आले होते. या चित्रपटाचे काम सुरु होणारच होते तर साराने या चित्रपटात काम करण्यास सलमानला नकार दिला. साराने नकार दिल्यानंतर या भूमिकेसाठी कॅटरिना कैफला विचारण्यात आले. कॅटरिना कैफने ही भूमिका स्वीकारली. त्यामुळे आता आयुष कॅटरिनासोबत करण जोहर आणि सलमान खानचा चित्रपट 'रात बाकी'मधून डेब्यू करणार आहे. याचित्रपटात आधी पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसुद्धा होता मात्र पाकिस्तानी कलाकारांवर टाकण्यात आलेल्या बंदीनंतर त्याचा पत्ता कट करण्यात आला. आता या चित्रपटात आयुष शर्मा आणि कॅटरिना कैफ दिसणार आहे. सारा अली खानने या चित्रपटाला रिजेक्ट करुन घेतलेला निर्णय बरोबर होता की चूक हे आपल्याला लवकरच कळले तसेच सारा आता एकता कपूरच्या चित्रपटातून बॉलिवू़डमध्ये डेब्यू करते आहे. याचित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूतसुद्धा झळकणार आहे.