Join us  

 सलमा आगा यांची मुलगी जारा खानला इन्स्टावर बलात्काराची धमकी, 23 वर्षांच्या तरूणीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 3:22 PM

जाराला बलात्काराची धमकी देणारी आरोपी मुलगी हैदराबादची आहे.

ठळक मुद्देमूळच्या पाकिस्तानी वंशाच्या असलेल्या सलमा आगा यांचा जन्म लंडनमध्ये झाला. लंडनमध्येच त्यांचे बालपण गेले.

दिल के अरमां आसुओं में बह गए...  म्हणत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी गायिका आणि बॉलिवूडची अभिनेत्री म्हणजे सलमा आगा.आपला अभिनय, सौंदर्य, दिलखेचक अदा यासोबतच सुरेल अंदाज यामुळे सलमा आगा यांनी बॉलिवूडमध्ये 80-90 चा काळ गाजवला. याच सलमा आगांची लेक जारा खान सध्या चर्चेतआहे. जाराने मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात इन्स्टाग्रामवर बलात्काराची धमकी मिळाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी 23 वर्षांच्या एका तरूणीला अटक केली आहे.बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार,  जाराला बलात्काराची धमकी देणारी आरोपी मुलगी हैदराबादची आहे. ती एमबीएची विद्यार्थीनी आहे. नूरा सरवर असे तिने नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिने आपले बनावट प्रोफाईल बनवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूरा व तिचा को-वर्कर एका राजकीय पक्षासाठी काम करतात आणि ते जाराला धमक्या देत होते. जाराने इन्स्टाग्रामवर बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार दाखल केली होती. तिची तक्रार सायबर सेलकडे पाठवण्यात आली होती. यानंतर पोलिस आयपी अ‍ॅड्रेसच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहोचले.आई सलमा आगा यांच्या पावलावर पाऊल ठेवत जारा खान  अभिनयात नशीब आजमावत आहे. अर्जुन कपूरच्या अपोझिट ‘औरंगजेब’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ‘देसी कट्टा’ या सिनेमातही ती दिसली होती.

मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या असलेल्या सलमा आगा यांचा जन्म लंडनमध्ये झाला. लंडनमध्येच त्यांचे बालपण गेले. कोणत्याही तरुणीला रुपेरी पडद्याची भुरळ पडावी तशी ती सलमा आगा यांनाही पडली आणि त्या बॉलिवूडकडे आकर्षित झाल्या. बी.आर. चोप्रा यांच्या ‘निकाह’ सिनेमातून सलमा आगा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सलमा आगा यांच्याकडे घायाळ करणारे सौंदर्य, अभिनय कौशल्यासह मधुर सूरांची दैवी देणगी होती.त्यामुळेच पहिल्यावहिल्या सिनेमात त्यांना अभिनयासह पार्श्वगायनाची संधी लाभली. या सिनेमातील  दिल के अरमां आसुओं में बह गए...  या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पहिल्याच सिनेमाने त्यांना रातोरात स्टार बनवले. मात्र हे स्टारपण प्रत्येकाला जपता येत नाही. हीच बाब सलमा आगा यांच्या बाबतीतही घडलीय. त्यांनी अनेक सिनेमा केले. मात्र रसिकांनी या सिनेमांना नाकारले.

‘पाहू नका’चे पोस्टर्स लागूनही ‘निकाह’ पाहण्यासाठी लागल्या होत्या रांगा

टॅग्स :बॉलिवूड