सैफ-करिनाच्या लाडक्या तैमूरचा पहिला बर्थ डे असा करणार साजरा; मावशी करिष्मा कपूरने केला उलगडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 14:25 IST
करिना कपूर-खान आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर लवकरच एक वर्षाचा होणार आहे. त्यामुळे या छोट्या नवाबाचा पहिला ...
सैफ-करिनाच्या लाडक्या तैमूरचा पहिला बर्थ डे असा करणार साजरा; मावशी करिष्मा कपूरने केला उलगडा!
करिना कपूर-खान आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर लवकरच एक वर्षाचा होणार आहे. त्यामुळे या छोट्या नवाबाचा पहिला बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी संपूर्ण कपूर आणि पतौडी खानदान तयारी करीत आहे. बर्थ डेकरिता कोणाला आमंत्रित केले जाणार? त्याचबरोबर सेलिब्रेशन कुठे केले जाणार? याबाबत सध्या खास प्लॅनिंग केले जात आहे. दरम्यान, मावशी करिष्मा कपूरने तैमूरच्या चाहत्यांची उत्सुकता काहीशी कमी करण्यासाठी त्याच्या बर्थ डे प्लॅनिंगचा उलगडा केला आहे. करिष्माने सांगितले की, ‘आम्ही सर्वच तैमूरच्या बर्थ डेसाठी खूप एक्सायटेड आहोत. त्याचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आतापासूनच तयारी करीत आहोत. आम्ही या दिवसाची खूप प्रतीक्षा करीत आहोत. गेल्यावर्षी २० डिसेंबर रोजी तैमूरचा जन्म झाला होता. येत्या डिसेंबर महिन्यात करिनाचा लाडका तैमूर एक वर्षाचा होणार आहे. मावशी करिष्माने सांगितले की, ‘तैमूरच्या बर्थ डे वर आम्ही एका फॅमिली गेट टुगेदरचे प्लॅनिंग करीत आहोत. त्याच्या पहिल्या बर्थ डे साठी फारसे सेलिब्रेशन केले जाणार नाही. परंतु सेलिब्रेशनमध्ये करिना आणि सैफच्या परिवारातील आणि त्यांचे मित्र सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच निर्माता तथा दिग्दर्शक करण जोहरने म्हटले होते की, तो लवकरच त्याच्या यश आणि जुही या जुळ्या मुलांना तैमूरला भेटायला घेऊन जाणार आहे. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, तैमूरच्या बर्थ डे लाच करणची जुळी मुले त्याला भेटायला येतील. तर करिना आपल्या लाडक्याचा वाढदिवस अधिक अविस्मरणीय करण्यासाठी सध्या धडपड करीत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहिद कपूरच्या लाडक्या मिशाने तिचा पहिला बर्थ डे सेलिब्रेट केला. मात्र शाहिदने मुलीचे बर्थ डे फारशा ग्रॅण्ड पद्धतीने साजरा केला नव्हता.