Join us  

तैमूर एकटा पडू नये म्हणून, सैफ आणि करिनाने त्याच्या जन्माआधीच घेतला होता होता मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 1:39 PM

तैमूरची काळजी घेण्यासाठी या दोघांनी एक नियम केला आणि त्याचं ते तंतोतंत पालन करत असून या नव्या नियमामुळे तैमूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 बी- टाऊनमध्ये तैमूर अली खानची जास्त चर्चा आणि बातम्या ऐकायला मिळतात. प्रत्येक लहानसहान गोष्टी आणि तैमूरवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात. तैमूर सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्याच्या बाललीला आणि त्याचा निरागसपणा साऱ्यांनात भावतो.बालपणीच तैमूरची लोकप्रियता बड्या सेलिब्रिटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याचा एक फोटोही सोशल मीडियावर तुफान पंसती मिळवत असतो. करिना दुस-यांदा प्रेग्नंट आहे.

लवकरच  तैमूरनंतर दुस-यांदा बाळाला  जन्म देणार असल्यामुळे सैफ आणि करिना बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे नियोजन करणे गरजेचे आहे. अगदी तैमूरच्या जन्माआधीच या दोघांनी एक मोठा निर्णय घेतला होता.

तैमूरची काळजी घेण्यासाठी या दोघांनी एक नियम केला आणि त्याचं ते तंतोतंत पालन करत असून या नव्या नियमामुळे तैमूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असल्या तरी त्याचं बालपण जपणं ही माझी आणि सैफची पालक म्हणून जबाबदारी आहे असं बॉलीवूडची बेगम अभिनेत्री करीना कपूर खान हिने म्हटलं होतं. 

मुलांना तुमच्या आयुष्यात स्थान देणं गरजेचं असतं. त्यांना तुमच्या जीवनात सामावून घ्या. तैमूर माझ्यात आणि सैफमध्ये गुंतला आहे. आम्ही कुठेही जात असलो तरी तो आमच्यासोबत असतो. मी किंवा सैफ शूटिंगला जात असलो तरी तो सोबत असतो. सात महिन्यांचा असल्यापासून तो आमच्यासोबत प्रवास करतो. आमच्या जीवनशैलीसह त्यानं जुळवून घेणं गरजेचं आहे.

आजचं डिजीटल युग आहे. त्यातच आम्ही कलाकार असल्याने सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असतात. तरीही तैमूरचे फोटो काढावे असं सगळ्यांना का वाटतं माहिती नाही. मात्र हरकत नाही. तैमूरला कोणत्याही बाळाप्रमाणे आम्ही वाढवत आहोत.

त्याचे फोटो काढले जातील म्हणून त्याला बाहेर जाण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. इतर मुलांसारखं त्यालाही जीवन जगणं गरजेचं आहे. त्याला बाहेर जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्याचं बालपण कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.  

 

टॅग्स :करिना कपूरतैमुर