सैफ अली खानच्या फोटोने दिला धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 17:11 IST
एका ब्रिटिश महिलेला आलेल्या डिप्रेशनचे कारण सैफ अली खानचा फोटो ठरला आहे. एका व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सैफ ...
सैफ अली खानच्या फोटोने दिला धोका
एका ब्रिटिश महिलेला आलेल्या डिप्रेशनचे कारण सैफ अली खानचा फोटो ठरला आहे. एका व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सैफ अली खानचा फोटो लावून ब्रिटेनमधील एना रोवे हिला धोका दिला आहे. टिंडर या सोशल डेटिंगसाईटवर हा प्रकार घडला आहे. टिंडर ही सोशल नेटवर्किंग साईट जोडीदार शोधण्यात मदत करते असे सांगितले जाते. मात्र या घटनेतून बॉलिवूड सेलिब्रटींच्या देखण्या रुपाचा आधार घेऊन फसविण्यात आल्याचा प्रकार उघडक ीस आला आहे. एंटोनी राय नावाच्या एका व्यक्तीने टिंटरवर आपला फेक प्रोफाईल तयार केला होता, प्रोफाईल पिक्चरच्या जागी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याचा फोटो वापरला. यानंतर त्याने एना रोवे या महिलेसोबत सुमारे १४ महिने तिचा प्रेमी असल्याचे सांगून चॅटिंग केली. दोघेही एकमेकांना रोमाँटिक मॅसेज पाठवित होते. दरम्यान एनाची रुची वाढत असल्याने तिने जोडीदार म्हणून निवडण्याआधी एंटोनीची एका इन्वेस्टिगेटरच्या माध्यमातून चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीनंतर एनावर आभाळच कोसळले. इन्वेस्टिगेटरने दिलेल्या माहितीनुसार एंटोनीचा विवाह झाला होता. त्याला एक मुलगा देखील होता. शिवाय त्याच्याजवळ दोन सेलफोन देखील होते. त्याच्यावर त्याचे दोन वेगवेगळे सोशल मीडिया अकाऊंट होते. एनाला या गोष्टींची माहिती मिळताच तिला मोठा धक्का बसला. यातून बाहेर येण्यासाठी तिला अनेक वेळा काऊंसलरची मदत घ्यावी लागली. आता ती जेमतेम डिप्रेशनमधून बाहेर पडली असून तिने सरकारला बनावटी किंवा खोटे सोशल मीडिया अकाऊंट तयार करणाºयांवर कडक कार्यवाही करावी व त्याची दखल गुन्हा म्हणून घ्यावी. या बातमीनंतर अनेक महिलांनी एंटोनीने धोका दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान सोशल मीडियावर ज्या दिवशी सैफ अली खानने आपले अकाऊंट सुरू करण्याची घोषणा केली होती त्याच दिवसापासून ही बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. आपल्या देशातही प्रोफाईल पिक्चरवर अभिनेत्यांचे फोटो लावणे सामान्य बाब आहे.