Join us

​सैफ अली खानच्या ‘बाजार’मध्ये राधिका आपटेची वर्णी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 15:54 IST

काही दिवसांपूर्वीच सैफ अली खानच्या ‘बाजार’ या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ...

काही दिवसांपूर्वीच सैफ अली खानच्या ‘बाजार’ या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटाशी संबंधित एक वेगळी बातमी आहे. होय, या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटे हिची वर्णी लागली आहे.‘बाजार’च्या निर्मात्या मधू भोजवानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राधिका या चित्रपटात आहे, हे खरे आहे. तिची भूमिका पूर्णपणे परफॉर्मन्स ओरिएन्टेड असणार आहे. या भूमिकेसाठी आम्हाला एका गुणी अभिनेत्रीचा शोध होता. आमचा हा शोध राधिकाजवळ येऊन थांबला, असे त्यांनी सांगितले.आता राधिकाची जोडी सैफसोबत असणार की, रोहन मेहरासोबत?(विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतो आहे.) याचा खुलासा मात्र होऊ शकला नाही. भोजवानी यांनी याबाबत फार माहिती देणे टाळले.‘बाजार’ या चित्रपटाची कथा ‘द वुल्फ आॅफ वॉल स्ट्रीट’वर आधारित आहे. गौरव चावला दिग्दर्शित या चित्रपटात भारतीय स्टॉक मार्केटवर कथा गुंफली गेली आहे. यात सैफ अली खान एका बिझनसमॅनच्या भूमिकेत आहे. काल-परवा जारी करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सैफ काहीशा वयाने मोठ्या व्यक्तीची भूमिकेत दिसतो आहे. त्याच्यावर एक सावली दिसतेय. ही सावली रोहन मेहराची आहे. ‘यहां पैसा भगवान नहीं, पर भगवान से कम भी नही,’अशी टॅगलाईन या पोस्टरवर दिसते आहे.येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे. सैफचा यापूर्वी आलेला ‘रंगून’ हा सिनेमा बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. त्यामुळे या आगामी चित्रपटांकडून सैफला बरीच अपेक्षा आहे.