Join us

वडिलांच्या मांडीवर बसलेली ही चिमुरडी आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 13:43 IST

सोशल मीडियावर सध्या हा फोटो जोरदार व्हायरल होतो आहे.

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री सारा अली खान आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत घरात वेळा स्पेंट करते आहे. याचदरम्यान ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता साराचा एक क्युट फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. यात सारा वडील सैफ अली खानच्या मांडीवर बसलेली दिसतेय. सारा या फोटोत वडिलांना काही तरी भरवण्याचा प्रयत्न करतेय. या फोटोत बाप-लेकीच चांगले बॉन्डिग दिसतेय.  फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येतो आहे. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सारा लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार आहे. लवकरच सारा अली खान वरूण धवनसोबत ‘कुली नं.१’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत.

टॅग्स :सारा अली खानसैफ अली खान